पथनाट्याद्वारे पर्यावरणाबाबत जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथनाट्याद्वारे पर्यावरणाबाबत जागृती
पथनाट्याद्वारे पर्यावरणाबाबत जागृती

पथनाट्याद्वारे पर्यावरणाबाबत जागृती

sakal_logo
By

20776
-------------
पथनाट्याद्वारे पर्यावरणाबाबत जागृती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील घाळी महाविद्यालयातील पर्यावरण विभागाच्यावतीने पथनाट्य, रॅली, प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. गडहिंग्लज नगरपरिषदेचे यासाठी सहकार्य मिळाले. पालिकेच्यावतीने पर्यावरण जागृती मोहिम सुरु आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम घेतला.
महाविद्यालयातून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीमध्ये पर्यावरण जनजागृती अभियानात काम करणारे पर्यावरण दूत, एनसीसी कॅडेटस, सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले होते. भडगाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संकेश्‍वर रोड, वीरशैव चौक, बाजारपेठ मार्गावरुन फिरुन ही रॅली नगरपरिषदेजवळ आली. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा, प्लास्टिकमुक्ती झाली पाहिजे, प्रदूषणमुक्त करा देशाला वाचवा अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पालिकेच्या प्रांगणात शुभम राऊत याने प्रदुषणमुक्त, प्लास्टिकमुक्त गडहिंग्लज शहर करण्यासाठी व पर्यावरण वाचवण्याचे आवाहन केले. इंद्रजित गाडे, साक्षी तिबीले व सहकाऱ्‍यांनी पथनाट्य सादर केले. पथनाटयातील मार्मिक संवादातून प्रदूषणाची भयानक समस्या लक्षात आणून दिली. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते पथनाट्यातील कलाकारांचा सत्कार झाला. तत्कालीन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नूतन मुख्याधिकारी स्वरुप खारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. अनिल उंदरे, प्रा. अश्‍विन गोडघाटे, विकास अतिग्रे, अनिल मगर, महेश वंडकर, डॉ. राजाराम सावंत, डॉ. नागेश मासाळ, प्रा. सचिन जानवेकर आदी उपस्थित होते. डॉ. निलेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले. वृक्ष प्राधीकरण समिती सदस्य अनंत पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56771 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top