ज्ञानदिप प्रबोधिनीला लाखाची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानदिप प्रबोधिनीला लाखाची देणगी
ज्ञानदिप प्रबोधिनीला लाखाची देणगी

ज्ञानदिप प्रबोधिनीला लाखाची देणगी

sakal_logo
By

GAD102.JPG
गडहिंग्लज : ज्ञानदीप प्रबोधिनीला देणगी दिल्याबद्दल ऋषीकेश गोडबोले यांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले. शेजारी व्ही. के. मायदेव, डॉ. बी. एस. पाटील, संदीप कागवाडे, डी. के. मायदेव, दत्ता पाटील आदी.
-------------------------------------------------
ज्ञानदिप प्रबोधिनीला लाखाची देणगी
सेवाभावी संस्था : ‘झेप’सह विविध उपक्रमांना मिळाले बळ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील ज्ञानदिप प्रबोधिनीला कोल्हापुरातील आदित्य फायनान्सचे ऋषीकेश गोडबोले यांनी एक लाखाची देणगी दिली. त्यामुळे झेप अकॅडमीसह या सेवाभावी उपक्रमांना पाठबळ मिळाले आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह सीमाभागातील हुशार होतकरु व ग्रामीण मुलांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह विविध सामाजिक उपक्रमाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्ञानदिप प्रबोधिनीची स्थापना केली आहे. समाजातील शिक्षणप्रेमी दानशूर मंडळींच्या प्रतिसादामुळे भक्कम लोकाश्रम मिळत आहे. श्री. गोडबोले यांनीही उपक्रमात सहभाग नोंदवला. भरीव देणगी दिल्याबद्दल गोडबोले यांचा रवळनाथ व ज्ञानदिपचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते सत्कार केला. श्री. गोडबोले यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. चौगुले, मीना रिंगणे, श्रीमती उमा तोरगल्ली यांची भाषणे झाली. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. रवळनाथचे सीईओ डी. के. मायदेव यांनी गोडबोले यांचा परिचय करुन दिला. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. सचिव संदीप कागवाडे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सहसचिव प्रा. व्ही. के. मायदेव, खजिनदार महेश मजती, संचालक डॉ. संजय चौगुले, आर. एस. निळपणकर, रेखा पोतदार, प्रा. मनोहर गुरबे, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, सीमा साठे, श्‍वेता टोण्णावर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56772 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top