राजाराम हॉल गार्डनचा होणार कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम हॉल गार्डनचा होणार कायापालट
राजाराम हॉल गार्डनचा होणार कायापालट

राजाराम हॉल गार्डनचा होणार कायापालट

sakal_logo
By

राजाराम हॉल गार्डनला
एक कोटीचा निधी

कोल्हापूर, ता. १० ः राजारामपुरीतील राजाराम हॉल गार्डनसाठी एक कोटीचा विकास आराखडा तयार आहे. वर्षभरात गार्डनचा कायापालट केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजारामपुरीवासीयांना दिली. त्याचबरोबर त्यांनी नऊ नंबर शाळेच्या मैदानासाठी २५ लाखांच्या निधीचीही घोषणा केली.
पण हे मैदान फक्त खेळासाठीच असेल येथे कोणत्याही वाहनांचे पार्किंग करू दिले जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजारामपुरीतील राजाराम हॉल गार्डन हा राजारामपुरीवासीयांचा आत्मा आहे. या गार्डनचा विकास व्हावा अशी मागणी बैठकीत अनेकांनी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी संबधित गार्डन विकसित करण्यासाठी एक कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामाध्यमातून हे गार्डन वर्षभरात असे विकसित केली जाईल की ती राजारामपुरीच्या वैभवात भर टाकणारी असेल असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56774 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top