
''उन्हाळी शिबिर'' पाल्य व पालकांची मानसिकता
मुलांची आवड, मानसिकता महत्वाची
उन्हाळी शिबिरे प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाल्यामुळे ओढा वाढला
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : उन्हाळी शिबिरे सुरू झाली असून, अनेक ठिकाणी याचे आयोजन केले आहे. मुळातच विविध खेळांबरोबर मोहिमा, घोडेस्वारी, विविध कलाकुसर या गोष्टी सुरु झाल्या आहेत. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर प्रत्येकालाच ही एक नामी संधी आहे. अशातच दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या शिबिरांची सुरुवात झाल्यामुळे अनेकांचा ओढा वाढला आहे; पण शिबिराची निवड करताना मुलांच्या आवडीचा आणि मानसिकतेचा विचार होणे गरजेचे आहे. मुलांमध्ये येणारा थकवा, तो दूर होण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी उन्हाळी सुटी असते. मात्र, पालकांच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी बालकांची उन्हाळी सुटीही वेगवेगळ्या क्लासमध्ये जाते. मात्र, काही पालक उन्हाळी सुट्टीतही आपल्या नियोजनाप्रमाणे बालकाला गुंतवून ठेवतात. खरंतर सुटी ही शरीराचा आणि मानसिक थकवा दूर कारण्यासाठीही असते. त्यासाठी कुटुंबानेही मुलांची काळजी घेतली पाहिजे. आपले घरच छंदवर्ग होऊ शकते.
सुटीत मुलांनी एकत्र खेळायला हवे. कॅरम, बुद्धिबळ, सापशिडीसारखे बैठे खेळ व क्रिकेट, लपाछपी, बॅडमिंटन, सायकलिंग अशा मैदानी खेळातूनही एकसंघपणा वाढीस मदत मिळते. पालकांनी मुलांसोबत बसून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी रोज एखाद्या अक्षरांचा, आकड्यांचा, शब्दांचा खेळ खेळण्यासाठी, चित्रं रंगवण्यासाठी, गोष्टी व बालनाट्य वाचून दाखवण्यासाठी, घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांची मदत घेण्यासाठी अशी ही सुटी असते. पैसा खर्च करून शिबिरांना पाठवतो नुसते हे महत्त्वाचे नसून तुम्ही, तुमच्या मुलांना घेऊन कोणत्या गोष्टीची, किती मजा घेतली हेही महत्त्वाचे ठरते.
चौकट
...तर मोठे नुकसान होऊ शकते
उन्हाळी शिबिरामध्ये मुलांना पाठवत असताना त्यांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. पालकांच्या इच्छेचे ओझे मुलांवर लादल्यास त्याचे मोठे नुकसान होऊ शकतात.
कोट
पालकांनी स्वतःचे छंद मुलांकडून पूर्ण करून घेण्यासाठी अथवा मला हे येते वा येत नाही हे तुला आले पाहिजे या अपेक्षेने मुलांना कुठेही पाठवण्यापूर्वी मुलांशी संवाद साधणे आणि त्यांची आवड समजून घेणे गरजेचे आहे. असे न झाल्यास त्याचा परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर होतो.
डॉ. निखिल चौगुले, मानसोपचार तज्ज्ञ
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56805 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..