पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न होतेय पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न होतेय पूर्ण
पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न होतेय पूर्ण

पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न होतेय पूर्ण

sakal_logo
By

20822
-----
पन्नास वर्षांपूर्वीचे स्वप्न होतेय पूर्ण
कोथळी-हरिपूर पूल पूर्णत्वाकडे : वृद्धांमधून समाधान
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ११ ः चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दानोळी परिसरातील गावातील नागरिक व शेतकरी सांगली बाजारपेठेशी संबधित होते. मात्र कृष्णा नदीमुळे वाहतूक करणे मुश्कील होत होते. त्यावेळेपासून कोथळी-हरिपूर दरम्यान नदीवर पूल करण्याची मागणी होती. आज त्यावेळीचे तरुण आता साठ वर्षांपुढे आहेत. त्यांच्या मनात होत असलेल्या पुलाबद्दल उत्सुकता होती. वेळोवेळी त्यांची याबाबत चर्चा होत होती. ही त्यांची उत्सुकता ओळखून गावातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना पूल प्रगतीपथावर आला आहे हे दाखवून आणले. त्यांची पूर्ण हयात पूल व्हावी अशी आशेवर गेली आणि आता ते पूल पूर्ण होताना पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
सध्या ग्रामपंचायत जवळील कट्ट्यावर गावातील वयस्कर मंडळी बसतात. त्यावेळी हरिपूर पुलाचा नेहमी विषय असतो. कारण ४०-५० वर्षांपूर्वी ते या मार्गाने सांगली बाजारपेठेला जात होते. त्यावेळी ते कावड, सायकलने भाजीपाला विकण्यासाठी जात होते. त्यावेळी नदीपात्रातून चालत किंवा होडीतून प्रवास करत. याची नेहमी चर्चा होत असे. संदीप हवलदार व त्यांच्यासोबतच्या सर्वांनी या ३० ते ३५ वृद्धांसाठी वाहनाची सोय करुन होत असलेल्या पूल परिसरात नेले. नक्की कुठे, कसा पूल होत आहे, ते प्रत्यक्ष त्यांना दाखविवले. यामध्ये ६० वर्षांपासून ते ९६ वर्षांपर्यंतच्या व्यक्ती होत्या. पूल बघून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या परिसरात बसून नाष्ट्याचा आस्वाद घेतला. पन्नास वर्षांपूर्वी कोथळी पुलाचे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत असलेले पाहून ते गहिरुन गेले.
उपक्रमासाठी संदीप हवलदार, जंबू सकाप्पा, वसंत पिसे, अनिल सकाप्पा, रावसो खिचडे, जिवंधर नेजकर, प्रविण पोवार, श्रीधर कोळी, संजय राऊत यांनी पुढाकार घेतला.
----

पूर्वी आमचा सर्व व्यवहार सांगली बाजारपेठेशी होता. वाहन नसल्याने हरिपूरमार्गे आम्ही चालत किंवा सायकलने प्रवास करीत होतो. नदीत पाणी असेल तेव्हा होडीचा आधार घेत होतो. तेव्हा येथे पूलाची सोय झाली असती तर आजही येथूनच ये-जा झाले असते. पण काळाच्या ओघात हा प्रश्न प्रलंबित राहिला. तो आता पूर्णत्वास येत आहे. ते आम्हाला या मुलांमुळे पहायला मिळाले. आमचे स्वप्न पूर्ण होत आहे हे बघून समाधान वाटत आहे.
-बाबूराव डांग, नागेश कुलकर्णी, दानोळी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56808 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top