मलगेवाडी- वाटंगी मार्गावर सुचना फलकाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलगेवाडी- वाटंगी मार्गावर सुचना फलकाची मागणी
मलगेवाडी- वाटंगी मार्गावर सुचना फलकाची मागणी

मलगेवाडी- वाटंगी मार्गावर सुचना फलकाची मागणी

sakal_logo
By

20836
-----------------------
मलगेवाडी- वाटंगी मार्गावर सुचना फलकाची मागणी
चंदगड, ता. १० ः मलगेवाडी - वाटंगी मार्गावर मलगेवाडीनजीक मोरीचे बांधकाम सुरु आहे. परंतु रस्त्याच्या अलिकडे व पलिकडे बांधकामाबाबत सुचना देणारे फलक नसल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे. येथे बांधकाम विभागाने सुचनाफलक उभे करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुरेश कुट्रे यांनी केली आहे.
चंदगड व आजरा तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. बांधकाम विभागाने या रस्त्यावर मलगेवाडीनजीकच्या ओढ्यावर मोरीचे बांधकाम सुरु केले आहे. त्याची सुचना देणारे फलक दोन्ही बाजूला जेथे रस्त्याची सुरवात होते तिथे लावणे गरजेचे आहे. चंदगड- गडहिंग्लज रस्त्याला जोडणाऱ्या या फाट्यापासून कामाचे अंतर सुमारे पाचशे मीटर आहे. पलीकडे वाटंगीपर्यंतचे अंतर सुमारे पाच किमी आहे. दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांना एवढे अंतर कापून येईपर्यंत या कामाची कल्पना येत नाही. शिवाय जेथे काम सुरु आहे तेथे दोन्ही बाजूंनी उतार आहे. त्यामुळे वाहन अचानकपणे खड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात कुट्रे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या कामासह तालुक्यात जेथे बांधकामे सुरु आहेत तेथे योग्य अंतरावर सुचना फलक लावून वाहनधारकांची सोय करावी अन्यथा वरीष्ठांकडे तक्रार करु असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56812 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top