‘धनंजय’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘धनंजय’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
‘धनंजय’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

‘धनंजय’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

sakal_logo
By

20837
-------------------------
‘धनंजय’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
चंदगडः नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालयाच्या २००१ च्या दहावीच्या बॅचचा मेळावा उत्साहात झाला. सुमारे २१ वर्षानंतर वर्गमित्र या निमित्ताने एकत्र आले. एकमेकांची ख्याली- खुशाली विचारण्याबरोबरच विविध क्षेत्रात काम करत असल्याची माहिती मिळाली. सुमारे साठ विद्यार्थी एकत्र आले होते. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात एकत्र जमून एकमेकांची नव्याने ओळख करुन घेतली. त्यानंतर ज्या वर्गात दहावीचे अध्यापन केले त्या वर्गात आणि त्याच बाकांवर बसण्याचा अनुभव घेतला. त्यावेळी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही निमंत्रीत केले होते. या गुरुजनांचा आदर सत्कार केला. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. ज्या शाळेत संस्काराचे धडे मिळाले, ज्या शिक्षणाच्या जोरावर आपल्याला सद्य स्थितीत करीत असलेल्या क्षेत्रामध्ये करीअर करण्याची संधी मिळाली त्याचे सर्व श्रेय गुरुजनांना दिले. दिवसभर एकत्र थांबून दुपारी स्नेहभोजन व सायंकाळी चहापान करुन सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56813 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top