अडकूरला गणेश मंदिर वास्तूशांती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडकूरला गणेश मंदिर वास्तूशांती
अडकूरला गणेश मंदिर वास्तूशांती

अडकूरला गणेश मंदिर वास्तूशांती

sakal_logo
By

अडकूरला गणेश मंदिर वास्तूशांती
चंदग ः अडकूर (ता. चंदगड) येथे श्री अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्त व देणगीदारांच्या सहकार्यातून रवळनाथ मंदिराच्या आवारात उभारलेल्या गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. चार दिवस चाललेल्या या उत्सवासाठी पंचक्रोशीसह आजरा, गडहिंग्लज, बेळगाव परीसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. गणेश मूर्ती व कळस मिरवणुकीला गावातील अबालवृध्द सहभागी झाले होते. त्यानंतर मूर्तीला जल, धान्य अभिषेक केला. वास्तूशांतीच्या मुख्य विधी दिवशी कीर्तनकार सुप्रियाताई साठे (पुणे) यांचे कीर्तन झाले. करवीरपीठाचे जगतगुरु शंकराचार्य महास्वामीजी व निडसोशी मठाचे महालिंगेश्वर स्वामी यांच्याहस्ते कळसारोहण केले. त्यादिवशी रात्री कोल्हापूर येथील कलाकारांनी कलापथक सादर केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56814 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top