शोषणुक्त समाजासाठी शाहूंनी शैक्षणिक क्रांती घडवली ः प्राचार्य मेणसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोषणुक्त समाजासाठी शाहूंनी शैक्षणिक क्रांती घडवली ः प्राचार्य मेणसे
शोषणुक्त समाजासाठी शाहूंनी शैक्षणिक क्रांती घडवली ः प्राचार्य मेणसे

शोषणुक्त समाजासाठी शाहूंनी शैक्षणिक क्रांती घडवली ः प्राचार्य मेणसे

sakal_logo
By

20840
चंदगड ः र. भा. माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान देताना प्राचार्य डॉ. आनंद मेणसे.

शोषणुक्त समाजासाठी शाहूंनी
शैक्षणिक क्रांती घडवली
प्राचार्य मेणसे; माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ ः छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. ज्ञानापासून वंचित समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. तत्कालीन समाज जात, धर्म, पंथ, व्यवसाय यावरून दुभंगलेला होता. त्यांना एकत्र करून शोषणमुक्त समाज निर्माण करायचा असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शैक्षणिक क्रांती केली, असे मत निवृत्त प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग आणि येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातर्फे आयोजित शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचे खासगीकरण या विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मेणसे म्हणाले, ‘शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे. पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. शाळांचे खासगीकरण धोकादायक आहे. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा टिकल्या पाहिजेत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.’ प्राचार्य पी. आर. पाटील म्हणाले, ‘बदलते शैक्षणिक धोरण व आव्हानांचा गांभीर्याने विचार करून विवेकी, कृतिशील, ज्ञानाधिष्ठित समाजव्यवस्थेसाठी जागरुकता महत्त्वाची आहे. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, अर्थशास्त्र परिषदेचे डॉ. राहुल म्हापरे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रा. डॉ. ए. वाय. जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56816 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top