चंदगडचा पाणी पुरवठा दर सोमवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडचा पाणी पुरवठा दर सोमवारी बंद
चंदगडचा पाणी पुरवठा दर सोमवारी बंद

चंदगडचा पाणी पुरवठा दर सोमवारी बंद

sakal_logo
By

उमगाव- न्हावेली सरपंचपदी पाटील
चंदगड ः उमगाव- न्हावेली (ता. चंदगड) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुक्माना पाटील यांची निवड झाली. श्री. पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक असून चंदगड तालुका कॉंग्रेसतर्फे त्यांचा सत्कार केला. पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तालुक्यात कॉंग्रेसवर विश्वास ठेवून राजकीय वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सरपंच पाटील म्हणाले, ‘उमगाव, न्हावेली हा परीसर दूर्गम असून या विभागाचे अनेक प्रश्न आहेत. सरपंचपदाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा माझा प्रयत्न राहिला.’ नामदेव नार्वेकर, वसंत पाटील, भरत देसाई उपस्थित होते.
----------------------------
चंदगडचा पाणी पुरवठा दर सोमवारी बंद
चंदगड ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रामलिंग तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठ्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे दर सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली आहे. नियमित पाणी पुरवठाही कमी दाबाने आणि अवेळी होणार आहे. नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगरंपचायतीने केले आहे.
------------------------------
नाभिक समाजाचा वधुवर मेळावा
चंदगड ः कोल्हापूर जिल्हा व बेळगाव परीसरातील नव वधु वरांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे २१ तारखेला वधू- वर पालक मेळावा होणार आहे. यासाठी नावनोंदणी करण्याचे फॉर्म संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षांकडे पाठवले आहेत. इच्छुकांनी ते उपलब्ध करुन घेऊन योग्य ती माहिती भरुन तालुका अध्यक्षांकडे जमा करावेत असे आवाहन केले आहे. 14 तारखपर्यंत फॉर्म स्विकारले जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56817 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top