
माकपतर्फे इचलकरंजीत शंखध्वनी
20848
माकपतर्फे इचलकरंजीत शंखध्वनी
शासनाचा निषेध; दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी, ता.१० ः केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. परिणामी सामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेला जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन, अन्नधान्य यांचे दर कमी करावेत. घरगुती गॅसच्या किमतीत केलेली ५० रुपयांची वाढ त्वरित मागे घ्यावी. या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने येथील मलाबादे चौकात शंखध्वनी आंदोलन करीत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दरवाढ मागे घेण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
केंद्र सरकारने सोमवारपासून अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांची वाढ घोषित करून सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाच्या खाईत ढकलले आहे. ४५ टक्के गॅस हा भारतामध्ये निर्माण केला जातो. त्याचा उत्पादन खर्च नफा वजा करून १४ किलो गॅस सिलेंडर ५०० रुपयाला देता येते. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवऱ्या या मोदी सरकारला त्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करता आलेली नाही. महागाई, बेकारी विरुद्ध जनतेने संघटीत होवून संघर्ष करू नये, यासाठी जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करून दंगे धोपे करण्याचे कारस्थान केंद्र सरकार करीत आहे, असा आरोप यावेळी केला. आंदोलनात भाऊसाहेब कसबे, ए. बी. पाटील, शिवगोंडा खोत, आनंद चव्हाण, सदा मलाबादे, नूरमहमद बेळकुडे, धनाजी जाधव, सुभाष कांबळे, पार्वती जाधव, वच्छला भोसले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56836 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..