नदीवेस मार्गावर सुचना फलकाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीवेस मार्गावर सुचना फलकाची गरज
नदीवेस मार्गावर सुचना फलकाची गरज

नदीवेस मार्गावर सुचना फलकाची गरज

sakal_logo
By

20853
---
नदीवेस मार्गावर सूचना फलकाची गरज
दुभाजकाचे काम सुरू; बॅरिकेड लावण्याची आवश्यकता
इचलकरंजी, ता. ११ ः इचलकरंजी-कर्नाटक जोडणाऱ्या नदीवेस येथील मुख्य मार्गावर दुभाजकाचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावर काम सुरू असलेला कोणताही सूचना फलक तसेच बॅरिकेड नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकास जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने वाहतुकीचे प्रमाण अधिक असते. हा मार्ग जमिनीपासून १० ते १२ फूट उंच आहे. रात्री हा मार्ग आणखी धोकदायक होत असल्याने या मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सूचना फलक व बॅरिकेड लावण्याची आवश्यकता आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून कर्नाटक सीमा भाग आहे. त्यामुळे कर्नाटकमधून शिक्षण, रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. इचलकरंजी शहरातून कर्नाटकमध्ये दररोज प्रवास करणाऱ्‍यांचे प्रमाण जास्त आहे. हे प्रवाशी बहुतांशी नदी वेस, पंचगंगा पूल या प्रमुख मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग बहुतांश वेळा व्यस्त असतो. सध्या या मार्गावर दुभाजकाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यावर चर खोदली आहे. काही ठिकाणी एक फुटाचे सिमेंटचे दुभाजक बसवले आहे. मात्र हे काम सुरू असताना कोणताही सूचना फलक लावलेला नाही. त्यामुळे नेहमीच्या सवयीने प्रवास करणाऱ्‍या वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. त्यामुळे काम सुरू असलेला सूचना फलक, बॅरिकेड लावणे आवश्यक बनले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56839 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top