
आरटीओ निवेदन
20860
मुदतबाह्य रिक्षांना वर्षाची मुदतवाढ द्या
महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेची आरटीओकडे मागणी
कोल्हापूर, ता. १० ः वीस वर्षांहून अधिकच्या जुन्या रिक्षांवरील कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) थांबवावी. संबंधित रिक्षांना वर्षाची वाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही. इंधनाचे दर, परवाना शुल्काचे दर वाढले आहेत. नवीन रिक्षाच्या किमतीसह विम्याची रक्कमही भरमसाट आहे. त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक मोडून निघाला आहे. त्यात जुन्या कालबाह्य रिक्षांवर कारवाई सुरू असल्याने रिक्षाचालकांचे संसार उघड्यावर येत आहेत, याचा विचार प्रशासनाने करून संबंधित रिक्षांचे एक वर्षासाठी पासिंग करून मिळावे. कारवाईची मोहीम स्थगित न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. रमेश पोवार, विष्णूपंत पोवार, सुनील खेडकर, विक्रम पोवार, राजू काझी, सुभाष पाटील, अशोक माने, अल्लाउद्दीन नाकाडे, सुनील खडतर, आर्या वाघमारे, विनोद जाधव, जयदीप सरवदे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56846 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..