सीपीआर आयकर सुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर आयकर सुट
सीपीआर आयकर सुट

सीपीआर आयकर सुट

sakal_logo
By

सीपीआर फोटो

देणगी देणाऱ्यांना ८० जी नुसार सवलत
--------------
डॉ. अजित लोकरे ः सीपीआरला आता मुक्तहस्ते मदत करता येणार

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१० ः सीपीआर रुग्णालयाला मुक्तहस्ते देणगी देणाऱ्यांना यापुढे ८० जी नुसार आयकरात सवलत मिळणार आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी सीपीआरला साहित्य रूपात तसेच रोख रक्कम देणगी दिल्यास त्यांनाही या सवलतीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्‍ठाता डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
सीपीआर रुग्णालयात कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, बेळगाव भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचाराला येतात. येथे हृदय शस्त्रक्रिया, अस्थीरोग, प्रसूती, बालरोग, कान, नाक, घसा, मेडिसीन, डायलेसीस अशा विविध विभागांत रोज जवळपास साडेतीनशेहून अधिक रुग्ण उपचार घेतात.
या रुग्णांना उपचार देण्यासाठी विविध संस्था, संघटना, पक्ष, दानशूर व्यक्ती देणगी किंवा वस्तू रूपात भेट देतात. त्यांना यापूर्वी आयकरात सवलत मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांना तांत्रिकदृष्टीने मदत देण्यात अडचणी येत होत्या. ही बाब विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने आयकर विभागाकडे पाठपुरावा करून देणगीदारांसाठी ८० जी नुसार आयकरमध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सीपीआरला ८० जीचे प्रमाणपत्र मिळाले. त्याचा कालावधी २०२५ पर्यंतचा असल्याने येथे सढळ हस्ते देणगी रोख रक्कमेत किंवा वस्तू रूपात देता येणे सुलभ झाले आहे.

कोट
रुग्णालयाचा वाढता व्याप तसेच मिळणारी उपचार सेवा सक्षम असली तरी ही सेवा जास्त घटकांपर्यंत पोहोचविताना काही सुविधांची कमतरता भासते. ही कमतरता भरून काढण्यासाठी देणगीदारांनी पुढाकार घेऊन वस्तू किंवा देणगी दिल्यास उपचार अधिक सक्षमपणे देणे शक्य होईल.
-डॉ.अजित लोकरे,अधिष्‍ठाता.

चौकट
देणगी समिती कार्यान्वित
सीपीआरमध्ये देणगी समिती कार्यान्वित केली आहे. या समितीकडे उद्योजक, व्यापारी, संस्था, संघटना, दानशूर व्यक्तींना देणगी देता येणे शक्य आहे. त्यानुसार रोख रक्कम, वस्तू अथवा यंत्रसामग्री अशी देणगी देता येणार आहे. त्याची अधिकृत नोंद सीपीआरच्या देणगी समितीकडून घेतली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56852 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top