रिपब्लिकन पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिकन पार्टी
रिपब्लिकन पार्टी

रिपब्लिकन पार्टी

sakal_logo
By

20880

मागासवर्गीयांच्या पदोन्नती
आरक्षणाचा प्रश्न सोडवा

-रिपब्लिकन आठवले गटाची मागणी
-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १० ः मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
रिपब्लिकनचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. निवेदनातील माहिती अशी की, राज्यात मागासवर्गीय समाजावर भटके विमुक्त आणि आदिवासींवर अत्याचार होत आहेत. उपेक्षितांचे संवैधानिक हक्क अधिकार जपले पाहिजेत. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षण राज्य शासन देऊ शकले नाही. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यातही राज्य शासन असमर्थ ठरले. अल्पसंख्याक समाजाचे आरक्षण राज्य शासनाने इच्छा शक्तीअभावी राबवत नाही असेच दिसते. अशा स्थितीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
माळगे, रूपा वायदंडे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, अविनाश अंबपकर, विश्वास कांबळे, तानाजी कांबळे , बाळासाहेब कागलकर, मनोहर कांबळे आदी उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या
-अनुसुचित जातीसाठींचा राखीव निधी खर्च केलेली नाही
-महात्मा फुले अर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर
असलेल्या थेट कर्ज प्रकरणांचे तत्काळ वितरण करावे
-आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाप्रमाणे
१५ लाखंपर्यंत बॅंक हमी योजना लागू करावी
-सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी द्यावी अथवा सुलभ पद्धतीने
कर्ज द्यावे, ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती रद्द करावी
-भोंग्यावरून राज्यात सुरू असलेले राजकरण हे समाजात
तेढ निर्माण करणारे आहे, अशा समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56860 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top