मंडलिक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडलिक बातमी
मंडलिक बातमी

मंडलिक बातमी

sakal_logo
By

जिल्ह्यातील रस्‍त्यासाठी १५ कोटींचा
निधी ; खासदार मंडलिक
कोल्हापूर ः राज्य शासनाच्या बांधकाम विभागा अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारणासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. यात राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचा समावेश आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यातील दहा मुख्य मार्गासाठी हा निधी मिळाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व वर्क ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर या कामांना सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणणेसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन प्रा. मंडलिक यांनी दिले.

कागलमध्ये शरद पवार यांचे स्वागत
कागल : माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बेळगावला चालले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी कागल येथे त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बेळगाव येथीत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा बुधवारी सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे. श्री.पवार या कार्यक्रमासाठी कोल्हापूरहून कारने बेळगावकडे रवाना झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कागल येथे सकाळी महामार्गावर जमले होते. सकाळी साडेनऊ वाजता कागल येथे श्री. पवार यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, मनोज फराकटे, प्रविण काळबर आदी उपस्थित होते.

विविध स्पर्धांची आज अंतिम फेरी
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसह विज्ञान प्रदर्शनाच्या केंद्र व तालुका स्तरावरील विजेत्यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांची अंतिम फेरी बुधवार (ता. ११) होत आहे. शाहू छत्रपती मिल येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. या वेळी विज्ञान प्रदर्शनाची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. अंतिम फेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम याच ठिकाणी दुपारी तीन वाजता होणार आहे.कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

राधानगरीतील चार ग्रा.पं.ची पोटनिवडणूक
राधानगरी ः राधानगरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पाच जूनला मतदान होणार आहे.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती आणि जागांची संख्या -ढेंगेवाडी -2 ,शेळेवाडी, पुंगाव आणि येळवडे प्रत्येकी एक. मतमोजणी सहा जूनला होईल,अशी माहिती निवडणूक शाखेतून दिली.

जिल्हाधिकारी यांच्या भेटी रद्द
कोल्हापूर,: प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवारी (ता.१३) अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56865 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top