तीन पानी जुगार अड्डयावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन पानी जुगार अड्डयावर छापा
तीन पानी जुगार अड्डयावर छापा

तीन पानी जुगार अड्डयावर छापा

sakal_logo
By

गाडी ओव्हरटेक करण्यावरून
शहापूर येथे तरुणाला मारहाण
इचलकरंजी : शहापूर येथे गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून शहापूर येथे एका तरुणाला डोक्यात दगड मारून जखमी केले. याप्रकरणी अज्ञात मोटरसायकलस्वारावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद विजय बाबासो वठारें (वय २१) दिली आहे. ही घटना आज दुपारी कृष्णा नगर भागात घडली. माहिती अशी, वठारे हे डंपरमध्ये माती भरून सावली सोसायटीकडे जात होते. दुपारी एकच्या सुमारास शहापूर रोडवरील कृष्णानगर भागात आले असताना एक मोटरसायकलस्वाराने अचानक डंपर समोर येवून डंपर थांबविला. खाली उतरून डंपर चालक वठारे याच्याशी हुज्जत घातली. मोटरसायकलस्वाराने डंपरची काच फोडून नुकसान केले. त्याने वठारें याची गळपट्टी पकडून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच खाली पडलेला दगड उचलून वठारे याच्या डोक्यात मारून जखमी केले.

शहापुरात कामगाराची आत्महत्या
इचलकरंजी : शहापूर येथे एका कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. महेंद्र छोटुराम चौधरी (वय 27 रा. इंडस्ट्रीयल इस्टेट ,शहापुर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी धर्मेंद्रकुमार लालचंद वर्मा यांनी शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
शहापूर येथील औद्योगिक वसाहतीत सरस्वती टेक्स्टाईल नावाचा यंत्रमाग कारखाना आहे. चौधरी कारखान्यात काम करीत होता. त्याने कारखान्यातील स्टोअर रूममधील छताच्या लोखंडी अँगलला प्लास्टिक दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोवंश मांस साठाप्रकरणी एकावर गुन्हा
पेठवडगाव : बेकायदेशीर गोवंश जनावरांची कत्तल करुन मासांचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी इस्माइल कमालसाब बेपारी
(रा.बेपारी गल्ली,पेठवडगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान याप्रकरणी एकास बेदम मारहाण झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. येथील बेपारी वसाहतीत विनापरवाना, बेकायदेशीर जनावरांची कत्तल करुन मांसांचा साठा केल्याची माहिती काही कार्यकर्त्यांना मिळाली.
त्यांनी भेट दिली. यावेळी पाच गोण्यात ४५० किलो गोमास मिळाले. याकारणावरुन महिलांनी कार्यकत्यातील एकास मारहाण केली. त्यानंतर काही कार्यकर्ते एकत्रित येवून मास विक्री करणाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी फिर्याद पोलिस विशाल हुबाळे यांनी दिली आहे.

तीन पानी जुगार अड्डयावर छापा
कोल्हापूर ः ताराबाई येथील एका शेडमध्ये तीन पानी जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. त्यांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून ३१ हजाराहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. काल सायंकाळी ही कारवाई केली. रूपेश भोगले, मनोज भोसले, रणजित कारीदकर (तिघे ताराबाई पार्क), बबलू सय्यद, प्रमोद महाडिक (दोघे शाहूपुरी) आणि आय्याज सय्यद (रा. कदमवाडी) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मोटारसायकल धडकेत
महिला जखमी
कोल्हापूर ः लोणार वसाहत परिसरात अज्ञात मोटारसायलस्वाराच्या धडकेत महिला जखमी झाली. इंदुबाई तोंदले (वय ४९, रा. उचगाव) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

राधानगरी तालुक्यात बालविवाह रोखला

सरवडे ः राधानगरी तालुक्यात एका गावातबालविवाह रोखण्यात यश आले. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने अवनि संस्थेतर्फे बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प सुरू आहे. असाच प्रकार आज राधानगरी तालुक्यात घडत असताना तो बालविवाह रोखण्यात यश आले.
एका गावात एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह नात्यात होणार असल्याचे जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील यांना समजले. समजलेली माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना देताच त्यांनी मुलीचा बालविवाह थांबविण्यासाठी सांगितले.

तरूणास मारहाण
कोल्हापूर ः शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीत जेवण वाढण्यावरून तरूणास केलेल्या मारहाण प्रकरणी नात्यातीलच चौघा संशयितावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. रविवारी (ता.८) रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56878 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top