उदगाव ग्रामस्‍थांचे आमरण उपोषण सुर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगाव ग्रामस्‍थांचे आमरण उपोषण सुर
उदगाव ग्रामस्‍थांचे आमरण उपोषण सुर

उदगाव ग्रामस्‍थांचे आमरण उपोषण सुर

sakal_logo
By

20886

उदगाव ग्रामस्‍थांचे बेमूदत उपोषण

ग्रामपंचायतीत भ्रष्‍टाचार झाल्याचा आरोप ; सरपंच, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १० : उदगाव (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने व सदस्य यांनी नियम डावलून ग्रामनिधीचा गैरवापर केला आहे. १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वापरातही घोटाळा झाला आहे. या दोन्‍ही पदाधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी उदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह ग्रामस्थांनी जिल्‍हा परिषदेच्या आवारात बेमुदत उपोषणास आज सुरुवात केली. कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला.
उदगावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी पंचायतीचा निधी मनमानी पध्‍दतीने खर्च केला. पाईपलाईन लिकेज, गटर स्वच्छता, मुरूम वगैरे बाबीवर बनावट लोकांच्या नावे खर्च टाकून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनादवारे केला आहे. हे करताना बनावट कोटेशनचा वापर झाला असून हितचिंतकांना टेंडर देऊन घोटाळा केल्याचे म्‍हटले आहे. पेयजलचे काम सुरु आहे. गावसभा व मासिक मिटिंगमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय बिल अदा न करण्याचा निर्णय झाला होता. मात्र कंत्राटदाराशी संगनमत करुन बिल अदा करुनही ठरावाची व कायद्याची पायमल्‍ली केली असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

गावात नॅशनल डाईंग ॲण्‍ड ब्‍लिचिंग कारखाना आहे. त्याची १६ लाख थकबाकी असून त्यात डल्‍ला मारण्याचा प्रयत्‍न सुरु आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे ड्रेस व इतर पुरवठादारांना बेकायदेशीरपणे बेरर चेकद्वारे रकमा अदा केलेल्या आहेत. या भ्रष्‍टाचाराविरोधात १७ पैकी ९ सदस्यांनी लेखी विरोध करुनही दखल घेतली नसल्यानेच आंदोलन केसल्याचे त्यांनी स्‍पष्‍ट केले. निवेदन उपसरपंच रमेश मगदूम, सदस्य हिदायतुल्‍ला नदाफ, मेघराज वरेकर, सुनीत चौगले, भारती मगदूम, ज्योत्‍स्ना गदगडे, पूजा जाधव, जगन्‍नाथ पुजारी, सौरभ पाटील यांनी दिले आहे. आंदोलनात रमेश भोजकर, स्‍वस्‍तिक पाटील आदींनी भाग घेतला. भाजपचे भगवान काटे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

उदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्‍टाचार झाला आहे. ग्रामसेवक व पदाधिकारी मनमानी कारभार करत आहेत. काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत. मात्र भ्रष्‍टाचारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
-सावकार मादनाईक, स्वाभिमानी संघटनेचे नेते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56883 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top