
मुश्रीफ बातमी
पंचायत विकास अधिकारी
पदासाठी तज्ज्ञ समिती
-------------------
हसन मुश्रीफ; ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद होणार रद्द
.................
कोल्हापूर, ता. १० ः ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे गठण केल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या समितीत नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे ग्रामसेवक एकनाथ पंढरीनाथ ढाकणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असून, नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची सदस्य सचिवपदी नियुक्त केल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली. ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आवश्यकता व त्याची कारणमिमांसा जाणून घेईल. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास करेल. त्याचबरोबर वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांत अहवाल सादर करणार आहेत.
.........
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56890 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..