पालकमंत्री बैठक -सहा विषयावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री बैठक -सहा विषयावर
पालकमंत्री बैठक -सहा विषयावर

पालकमंत्री बैठक -सहा विषयावर

sakal_logo
By

डॉक्टरांची अपॉइंटमेंट, स्क्रीन बॅंकही
---
पालकमंत्री सतेज पाटील; ‘सीपीआर’मध्ये सुविधांसाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः ‘सीपीआर’मधील डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइमेंट मिळण्याबरोबरच स्क्रीन बॅंक, रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला. यासाठीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. खंडपीठ, तालुका क्रीडा संकुल, इनडोअर स्टेडियमच्या जागा ताब्यात घेण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. यासह इतर विषयांची आढावा बैठक आज सार्वजनिक बांधकाम विभागातील सभागृहात झाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की ‘सीपीआर’मधील डॉक्टरांना भेटण्यासाठी चंदगड, आजरा तालुक्यातील रुग्णांना यायचे असल्यास त्यांना अपॉइंटमेंट मिळेल का? याबाबत बैठकीत चर्चा झाली. ऑनलाईन अपॉईमेंट घेता येईल का? याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठीचे काम सुरू केले असून, १५ दिवसांत आराखडा समोर येईल. एक कोटीपर्यंतची कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करता येतील. अधिक निधीची कामे शासनाच्या निधीतून करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
-------------
ऊस उत्पादन वाढेल
कृषी विभागाच्या बैठकीत ऊस उत्पादन वाढविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात कोणत्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी ऊस उत्पादन कमी आहे, त्याचा आढावा घेतला जात आहे. उत्पादन वाढल्यानंतर कोल्हापूरची आर्थिक समृद्धी आणखी वाढेल, असा विश्‍वास आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
-------------

स्कीन बॅंकेचा होणार मोठा उपयोग
‘सीपीआर’मध्ये स्कीन बॅंक केली जाणार आहे. बर्न (भाजणे) विभागात या स्कीन बॅंकेचा मोठा उपयोग होईल. भाजलेल्या व्यक्तींना पुन्हा आहे, त्या स्थितीत येण्यासाठी स्कीनची गरज असते. बर्न विभागाच्या सुविधा वाढविण्यासाठीही आणि स्कीन बॅंकेसाठीही आवश्‍यक तो निधी दिला जाणार आहे.

------------
सर्वच बालकांना ऐकू येण्यासाठी...
ज्या बालकांना ऐकण्याची समस्या आहे, अशा बालकांना तीन वर्षांच्या आत योग्य उपचार झाले तर त्यांचा बहिरेपणा कायमचा जाऊ शकतो. त्यामुळे हे उपचार ‘सीपीआर’मध्ये होण्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी डॉक्टरांकडून केली आहे. त्याबाबत तातडीने प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या आहेत.
----------
महसूलमंत्री थोरात यांच्याकडे बैठक
शेंडापार्क परिसरात तालुका क्रीडा संकुलासाठी आणि खंडपीठासाठी जागा आरक्षित केली आहे. तसेच, हॉकी स्टेडियमशेजारील जागेतही ‘इनडोअर स्टेडियम’ साकारण्यात येणार आहे. त्याच्या पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी लवकरच महसूलमंत्री थोरात यांच्याबरोबर मुंबईत बैठक घेतली जाणार असल्याही त्यांनी सांगितले.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56894 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top