जात वैधता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जात वैधता
जात वैधता

जात वैधता

sakal_logo
By

जात वैधता प्रमाणपत्रासाठी
एक वर्षाभराची मुदतवाढ
मुश्रीफ ः सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा
कोल्हापूर, ता. १० ः राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी २०२१ मध्ये झाल्या. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या आदेशानुसार आता जात वैधता प्रमाणपत्र १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करता येतील, अशी घोषणा ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे, मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित राहू नये, यासाठी सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा २८ फेब्रुवारी २०२१ असा करून निवडून आल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत १७ जानेवारी २०२२ होती. जानेवारी २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले. त्यात राज्यातील कोविड-१९ च्या निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना पदापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष बाब म्हणून वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56897 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top