‘माणूस’पणासाठी मंदिरांची आवश्यकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माणूस’पणासाठी मंदिरांची आवश्यकता
‘माणूस’पणासाठी मंदिरांची आवश्यकता

‘माणूस’पणासाठी मंदिरांची आवश्यकता

sakal_logo
By

20890
----------------------------------------------------------------
‘माणूस’पणासाठी मंदिरांची आवश्यकता
शिवलिंगेश्‍वर महास्वामी : मुगळीत धर्मसभेला भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १० : जीवनात सर्व सुख-सोयी व भौतिक सुविधा असतानाही माणूस असमाधानी आहे. अशावेळी समाधानासाठी मठ आणि मंदिर एकमेव ठिकाण आहे. माणूस माणसासारखा राहिला पाहिजे यासाठी मंदिराची आवश्यकता असते, असे प्रतिपादन नीडसोशी मठाचे जगद्‌गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केले.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे श्री सोमलिंग मंदिर वास्तुशांती, मूर्तीप्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्याप्रसंगी आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. नूल सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही धर्मसभा झाली. यावेळी नूलचे गुरुसिद्धेश्‍वर महास्वामींचा तुलाभार केला.
शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, ‘केवळ चार हजार लोकसंख्येच्या या गावाने आर्थिक कुवत नसतानाही कष्टाने चांगले काम करून मंदिराची उभारणी केली. कितीही आर्थिक संकटे आली तरी त्यावर मात केले. गुरु आणि मंदिर हे समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याचे काम करतात.’
खासदार मंडलिक म्हणाले, ‘हेवेदावे, गट-तट न ठेवता सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर मुगळी गावचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले जाईल. गावात व्यायाम शाळा व प्राथमिक शाळेसाठी निधी देवू.’ आमदार पाटील म्हणाले, ‘दोन-अडीच वर्षात तीनशे कोटीची विकासकामे करता आली. आरबोळे आणि पाटील यांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची ताकद मुगळीकरांत आहे.’
चैताली अमीनभावी यांनी स्वागत गीत तर विवेकानंद स्वामी यांनी लिंगाष्टक म्हटले. स्वागताध्यक्ष सोमगोंडा आरबोळे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष रमेश आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. राजू शेट्टी, गुरु सिद्धेश्वर महास्वामी, भगवानगिरी महाराज, गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांची भाषणे झाली. अध्यक्ष रमेश आरबोळे व सोमगोंडा आरबोळे यांचा सत्कार झाला.
सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, महायोगी प्रबुद्ध चैतन्य महास्वामी, सिद्धेश्वर महास्वामी, अत्यानंद महास्वामी, गंगाधर देवरू महास्वामी, पंडित अनदानेश्वर शास्त्री, भाऊसाहेब महाराज यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. सुरेश कुराडे, भरमु गावडा, राजेंद्र गड्ड्यान्नावर, राणी खमलेहटी, राजू खमलेहटी, नरेंद्र भद्रापुर, बसवराज आजरी, अशोक महाडिक, बाळगोंडा पाटील, रायगोंडा पाटील, अ‍ॅड. गजानन पाटील आदी उपस्थित होते. अशपाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56908 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top