पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

खातेनिहाय चौकशीनंतर
बेअरिंग चोरीबाबत निर्णय
प्रा. सुनील शिंत्रे; सर्वच कर्मचारी दोषी नाहीत
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० ः आजरा कारखान्यात झालेल्या मील गनमेटल बेअरिंग चोरीबद्दल खातेनिहाय चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रसिद्ध पत्रकातून दिली.
बेअरिंग व इतर साहित्य चोरी झाल्याचा प्रकार कारखाना बॅंकेच्या ताब्यात दिल्यानंतर निदर्शनास आला. यावेळी ले ऑफ नंतर कर्मचारीही कामावर हजर झाले होते. त्याचवेळी कारखाना व्यवस्थापनाने चोरीबाबतची तक्रार आजरा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. चोरीचा छडा लावावा या उद्देशाने व सभासदांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने चौकशी समिती गठीत केली होती. यात संचालक मंडळाचे प्रतिनिधी तसेच कामगार प्रतिनिधी यांचा समावेश होता. समितीने मागणीनुसार त्यांना वकील दिला होता. चौकशी समितीने ३० एप्रिल २०२२ ला याचा अहवाल सादर केला. चौकशी समितीचे वकील अॅड. शैलेश देशपांडे यांच्या उपस्थिती चौकशी अहवालातील निष्कर्ष वाचून दाखवला. अहवालात चौकशी समितीने कोणावरही दोषारोप केले नसून काही कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही चोरी झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. परंतु त्यावेळच्या सर्वच कर्मचाऱ्यांची जबाबदारी असल्याचाही समितीने उल्लेख केल्यामुळे कामगार न्यायालयातील वकिलांकडून संबंधित कामगारांची खातेनिहाय चौकशी करुन प्रत्यक्ष चोरीस मदत करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालात संशयित कर्मचाऱ्यांची नावे असली तरी सर्वच गुन्हेगार नाहीत, किंबहुना ते कर्मचारी दोषी नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सत्य माहिती चौकशी अधिकाऱ्यांना देऊन चोरीचा उलगडा करण्यास मदत करावी. पोलिसांनी संबंधित स्क्रॅप खरेदीदारास बोलावून घेऊन चौकशी केल्यास चोरीचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56913 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top