कडगावला ३१ वर्षानंतर वर्गमित्रांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडगावला ३१ वर्षानंतर वर्गमित्रांचा स्नेहमेळावा
कडगावला ३१ वर्षानंतर वर्गमित्रांचा स्नेहमेळावा

कडगावला ३१ वर्षानंतर वर्गमित्रांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

20893
----------------------------------------------------------------
कडगावला ३१ वर्षानंतर वर्गमित्रांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : कडगाव येथे तब्बल ३१ वर्षांनी शंभर वर्गमित्र आणि मैत्रिण एकत्र आले. त्यांचा स्नेहमेळावा न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात उत्साहात झाला. दरम्यान, या मेळाव्यात काही दिवंगत वर्गमित्रांना आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळाव्यासाठी न्यू इंग्लिश स्कुलचे १९९०-९१ मधील दहावी बॅचचे वर्गमित्र आणि मैत्रिणींनी देशातून तसेच विदेशातून हजेरी लावली होती. माजी मुख्याध्यापक शामराव देसाई अध्यक्षस्थानी होते.
दीपक पाटील व शशिकला रणवरे यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन पाटील यांनी प्रास्ताविक कले. मेळाव्यात डॉ. धनाजी पाटील, संजय पाटील, विनोद कुंभार, सुनील पाटील, चारुशीला पवार, संगीता मैंद, वंदना मैंद, विद्या मठपती, नीता गोडसे, वैजयंता शेंडे, शोभा कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील, मनोहर पाटील, तानाजी पाटील, हेमंत जाधव, अनिल शिंदे आणि इतर वर्गमित्रांनी जुन्या आठवणीना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
सौ. देसाई, सौ. शेवाळे, श्री. घोरपडे, श्री. शिंदे, श्री. चौगुले, श्री. भोसले, पी ए पाटील यांची भाषणे झाली. शाळेचे माजी कला शिक्षक जी जे पाटील नटसम्राट मधील बेलवलकर, इथे ओशाळला मृत्यू नाटकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतील संवादफेक सादर केली. शाळेतील एक वर्ग संपूर्ण सुशोभीत करण्यासाठी वर्गणी गोळा करुन लगेच कामाला सुरवातही केली. यावेळी गुरुजनांचा सत्कार आणि माजी विद्यार्थीनी शशिकला रणवरे यांचा शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. वंदना कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56914 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top