हलकर्णी येथे आजपासून महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णी येथे आजपासून महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती
हलकर्णी येथे आजपासून महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती

हलकर्णी येथे आजपासून महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती

sakal_logo
By

हलकर्णी येथे आजपासून
महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती
नूल, ता. १० : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे लोकवर्गणीतून नव्याने बांधलेल्या महालक्ष्मी मंदिराची वास्तुशांती व कळसारोहण सोहळा उद्यापासून (ता. ११) सुरु होणार आहे. १३ मेपर्यंत हा सोहळा चालणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता.११) सायंकाळी कळस मिरवणूक व होमहवन होणार आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहन व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यावेळी महालक्ष्मी यात्रा कमिटीकडून सुहासिनींची ओटी भरणी कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता.१३) सकाळी सहा वाजता ग्रामस्थांकडून देवीची ओटी भरणी केली जाणार आहे. सोहळ्यानिमित्त जनरल बैलगाडी शर्यती होणार आहेत. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, ३५ हजार व २५ हजार अशी बक्षिसे आहेत. घोडा व घोडा गाडी शर्यत रेकॉर्ड डान्स स्पर्धाचेही आयोजन केले आहे. स्थानिक कलाकारांचे कन्नड नाटक सादर होणार आहे. भाविकांनी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री महालक्ष्मी देवी मंदिर वास्तुशांती व कळसारोहण समारंभ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56920 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top