अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास
अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास

अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास

sakal_logo
By

टीपः swt१०२१.jpg मध्ये फोटो आहे.
20898 - सुनील पाटील

अत्याचार करणाऱ्यास
दहा वर्षे सश्रम कारावास
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील सुनील शिवाजी पाटील याला येथील न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.
सुनील पाटील याने जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. दरम्यान, पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलगी आरोपीसोबत आढळून आली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आरोपी सुनीलवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीचे वडील, पीडित मुलगी, हॉटेल मालक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुनील याला भादवि कलम ३७६ (२) (N) अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने जादा कैद, ३६३ अंतर्गत दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, ५०६ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी तर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक जे. के. पाटील यांनी तपास केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56924 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top