ग्राहक पंचायत समितीचा अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक पंचायत समितीचा अभ्यासक्रम
ग्राहक पंचायत समितीचा अभ्यासक्रम

ग्राहक पंचायत समितीचा अभ्यासक्रम

sakal_logo
By

20903

ग्राहक पंचायतीतर्फे
जिल्हास्तरीय अभ्यास वर्ग
कोल्हापूर, ता. १० : ‘‘अनुचित व्यापारी व्यवहार करणाऱ्या घटकांवर सज्जन शक्तीचा दबावगट निर्माण करून शोषणमुक्त समाज घडविणाऱ्या लोककल्याणकारी चळवळीत युवकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे,’’ असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर महानगरतर्फे ग्राहक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी बिंदुमाधव जोशी यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, प्रांत सचिव संदीप जंगम, प्रांत कोशाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी, प्रांत कार्यकारिणी सदस्य केदार नाईक, आंदोलन प्रमुख ॲड. तुषार झेंडे-पाटील उपस्थित होते. शाहूवाडी येथील आस्था सामाजिक अपंग संस्थेला व्हीलचेअर, कुबडी, श्रवणयंत्र, स्टिक आणि शालेय साहित्य देण्यात आले. प्रा. बाजीराव वारंग यांनी हे सर्व साहित्य स्वीकारले.
जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया दळवी यांनी स्वागत केले. महानगर अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी आभार मानले. वैदेही जोशी यांच्या पसायदानाने स्मारोप झाला. जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, महानगर संघटक सुहास गुरव, विनायक वाळवेकर, प्रशांत पुजारी, प्रशांत चौगुले, रवींद्र घाडगे, दत्तात्रय धडेल, अमर पाटील, अनिल जाधव, रमेश पाटील, विठ्ठल चव्हाण, संतोष हावळ, रविकांत कुलकर्णी, ॲड. ओंकार देवकाते, रवी घोडके, सूरज कुलकर्णी, कृष्णात जमदाडे, शिवलिंग कलंत्रे यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56928 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top