पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

तारदाळच्या तरुणाचा खून
आर्थिक व्यवहारातून
--
तिघांना अटक; संशयितात एका अल्पवयीन मुलाचा समावेश

तारदाळ, ता. १० : येथील महादेव निगडे याचा खून दुकान गाळ्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यात सूरज मेहबूब चिकोडे (वय २४, मराठी शाळेजवळ, तारदाळ), गणेश ऊर्फ हंप्या राजेश शिवारे (२८, तारदाळ) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
आंबा घाटातील गायमुख मंदिराजवळ ५ मे रोजी दरीत सडलेल्या अवस्थेत महादेव याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी देवरूख पोलिसांत ९ मे रोजी खुनाचा गुन्हा नोंद केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला निगडे हा बेपत्ता झाल्याचे समजले. त्याचे वर्णन आणि मृतदेहाचे वर्णन जुळल्यानंतर तपासाला गती आली. त्यानंतर पथकाने तारदाळ येथे येऊन माहिती घेतली असता खुनाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मुख्य संशयित सूरज मेहबूब चिकोडे व गणेश ऊर्फ हंप्या राजू शिवारे याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी १६ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे कबूल केले आहे. यातील सूरज व गणेश याला न्यायालयात हजर केले असता १६ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली. याबाबतचा तपास देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. तपासात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. शहा, सहाय्यक फौजदार प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, अरुण चाळके, बाळू पालकर, योगेश नागवेकर, दत्ता कांबळे, सचिन भुजबळराव, संतोष सडकर यांनी सहभाग घेतला. शहापूर पोलिसांसह कोल्हापूर पोलिसांचे सहकार्य मिळाले.

सूरज चिकोडे सराईत गुन्हेगार
या खून प्रकरणातील मुख्य संशयित सूरज चिकोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे जयसिंगपूर, शहापूर पोलिस ठाणे येथे दाखल आहेत. गुन्हेगारी वर्तुळात रावण गँगचा मुख्य म्होरक्या म्हणून तो कार्यरत असल्याची देवरूख पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56938 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top