नूलमध्ये हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूलमध्ये हाणामारी
नूलमध्ये हाणामारी

नूलमध्ये हाणामारी

sakal_logo
By

नूलमध्ये दोन कुटुंबांत हाणामारी
चौघे जखमी, परस्परविरोधी तक्रार; कोयता, खुरप्याचा वापर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता.१० : नूल (ता.गडहिंग्लज) येथील भीमनगरमध्ये आलापगोळ व दावणे कुटुंबीयांत हाणामारी झाली. या मारामारीत कोयत्यासह खुरप्याचा वापर झाला. यात चौघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली.
परशराम आलापगोळ, निंगव्वा आलापगोळ, सविता चव्हाण व आकाश दावणे अशी जखमींची नावे आहेत. परशरामच्या फिर्यादीनुसार आकाश दावणे, सागर दावणे, दुंडाप्पा दावणे, सत्त्यवा दावणे, पूजा दावणे, लक्ष्मीबाई दावणे यांच्या विरुद्ध तर आकाश दावणेच्या तक्रारीवरुन परशराम आलापगोळ, निंगव्वा आलापगोळ, सिद्धाप्पा आलापगोळ, सिंधू आलापगोळ यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले की, दावणे व आलापगोळ यांच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून घराजवळच्या वाटेवरुन ये-जा करण्याच्या कारणावरुन वाद आहे. २२ एप्रिल रोजी आलापगोळच्या घरावर सागर दावणेने दगड टाकले. त्यावेळी किरकोळ वाद झाला होता. हनुमान यात्रा असल्याने आलापगोळने तक्रार केली नव्हती. सोमवारी रात्री परशराम हा जेवण करुन कुटुंबासमवेत बसला असताना दावणे कुटुंबातील सदस्य येवून हनुमान यात्रेतील भांडण उकरुन काढले. त्यावेळी संशयित दावणे कुटुंबातील सर्वांनी परशराम, निंगव्वा व सविता चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आकाशने परशरामवर कोयत्याने वार केले. त्यात परशराम गंभीर जखमी आहे. मारामारीत निंगव्वा हिच्या गळ्यातील मंगळसूत्रही तुटून पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रात्री साडेअकराला आकाश हा गावातील सचिन शिंदे यांना भांडणाचे कारण सांगत असताना परशरामने आकाशवर खुरप्याने हल्ला करुन जखमी केले. त्याच्या आईवडिलांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56944 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top