
पत्रके पत्रकांच्या पत्रकांवरील बातम्या
20920
कोल्हापूर : जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के.
पर्यावरणपूरक समाज प्रबोधन करणे
हेच ध्येय अवलंबावे : डॉ. शिर्के
कोल्हापूर : ‘‘भावी पिढीचा विचार करुन पर्यावरणपूरक समाज प्रबोधन करणे हेच ध्येय सेवाभावी संघटनांनी अवलंबावे,’’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. जायंटस् ग्रूप ऑफ कोल्हापूर संस्थेचा ४७ व्या शपथ विधी, पदग्रहण समारंभ झाला. डॉ. शिर्के, डॉ. सतिश बापट, डॉ. अनिल माळी, मंगला कुलकर्णी, ॲड. विलासराव पोवार, रामदास रेवणकर, प्रा डॉ. महादेव शिंदे यांच्या उपस्थित दिपप्रज्वलन केले. मावळते अध्यक्ष सुरेश घाटगे यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक रविंद्र उबेरॉय, अरुण नरके यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. प्रा. शिंदे यांच्याकडून नुतन अध्यक्ष चंद्रकांत लोहार, संचालक, नविन सभासदांना शपथ प्रदान केली तर मानाचा हॅमर डॉ. सतिश बापट यांच्या हस्ते नुतन अध्यक्षांना सुपूर्द केला. घाटगे यांचा सपत्नीक सत्कार झाला. ग्रुपचा वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापला. कार्यवाह प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी आभार मानले. ग्रुपचे सर्व माजी अध्यक्ष, सभासद, निमंत्रित उपस्थित होते. स्पेशल ऑफिसर प्रकाश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
...
20931
कोल्हापूर : जिल्हा बौद्ध अवशेषतर्फे निवेदन देताना सदस्य.
जिल्हा बौद्ध अवशेषतर्फे निवेदन
कोल्हापूर : जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीतर्फे पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनातील माहितीनुसार, जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध अवशेषांचा विद्ध्वंस थांबवून सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी, मसाई पठार, पांडवदरा, पन्हाळा आणि कुशिरे पोहाळे येथील लेण्यांचे सरकारने, पुरातत्व खात्याने संवर्धन करून पर्यटनस्थळात रुपांतर करावे. बौद्ध जयंतीस येणाऱ्या बौद्ध बांधवांना रस्त्याची दुरुसती, आरोग्य, पाणी, अॅम्ब्युलन्स आदी सुविधा मिळाव्यात. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे, भन्ते धम्मदिप, युवराज कांबळे, अनिल कांबळे, विजय अंबपकर, बैजनाथ कांबळे, माणिक कांबळे, विविध बौद्ध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...
शाहू महाविद्यालयात पालक मेळावा
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात कला विभागाचा पालक मेळावा झाला. बी. ए. भाग १,२,३, मधील विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा हा मेळाव्याचा उद्देश होता. पालक मेळाव्याच्या अध्यक्षपदी प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार होते. डॉ. किल्लेदार म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालकांचा संवाद असणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी नेहमी सजग असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधावा.’’ डॉ. किल्लेदार यांनी पालकांना महाविद्यालयाची ओळख करून दिली. पालक धोंडीराम पुजारी, जयश्री दिंडे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यी शुभम पुजारी, अक्षय कांबळे, शुभांगी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कला शाखाप्रमुख डॉ. भाग्यश्री पुणतांबेकर यांनी स्वागत केले. मराठी विभागप्रमुख डॉ. सिंधू आवळे यांनी आभार मानले. डॉ. महेश रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले.
...
कोल्हापूर हायस्कूलमध्ये सेवानिवृत्ती समारंभ
कोल्हापूर : कोल्हापूर हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष एम. जी. वालिखिंडी, खजानिस आर. एम. जौंदाळ, संचालक पी. एस. वडगांवकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले श्री व सौ. आर. एस. आवळे, श्री व सौ. एस. एस. गड्डी, श्री व सौ. डी. वी. कोळी या उभयतांचा शाल, श्रीफळ, साडी, संस्थेचे मानचिन्ह देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक व्ही. डी. हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. व्ही. यू. माळकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. एल. गडकरी यांनी आभार मानले.
...
नरेंद्र विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : नरेंद्र विद्यापीठ संस्था आणि डॉ. न. ना. देशपांडे (राशिवडेकर) स्मृती समिती, वा. गो. कुलकर्णी (चिकोडीकर) स्मृती समिती, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक न. वा. जोशी (खडकलाटकर) स्मृतीगंधतर्फे दिले जाणारे आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक न. वा. जोशी सेवागौरव पुरस्कार ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळेचे अध्यक्ष डॉ. सुहास बोंद्रे, रमेश कुलकर्णी (हिंडलगा बेळगांव), सेवाव्रती जानकी न. जोशी (खडकलाटकर) सेवागौरव पुरस्कार अश्विनी सरनोबत (बेळगांव), दमयंती नरेंद्र देशपांडे (राशिवडेकर) गृहिणी गौरव पुरस्कार अस्मिता कुलकर्णी, वा. गो. कुलकर्णी (चिकोडीकर) उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार विकास कुलकर्णी, सुर्यकांत जुगदर (आष्टा), डॉ. न. ना. देशपांडे (राशिवडेकर) उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार ‘मरणासन्न हयातीची आर्जवे (डॉ. चंदू पवार, पुलगाव), ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस (योगिनी सातारकर-पांडे (नांदेड), ‘गुलमोहराचं कुंकू (प्रशांत केंदळे नाशिक), ‘कुंकवाखालची जमीन ढवळताना (रविंद्र केदा देवरे, चांदवड), ‘कैवार (शिवाजी नारायण शिंदे, सोलापूर), ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता (हबीब भंडारे, औरंगाबाद) या काव्यसंग्रहांना जाहीर झाले. पुरस्कार वितरणाची तारीख नंतर जाहीर करणेत येईल, असे संस्थाध्यक्ष प्रा. अरविंद देशपांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले.
...
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची आज सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने मासिक सभा बुधवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजता बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे आयोजित केली आहे. सुहास लिमये हे ‘ज्येष्ठांचे मन:शांतीकरीता संत वाड्.मय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांनी पत्रकाद्वारे केले.
...
जायंटस् ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
कोल्हापूर : रक्तदान महादान, जायंटस् ग्रुप ऑफ शिवसमर्थ व शिवरागिणीतर्फे रक्तदान शिबिर घेतले. ५० जणांनी रक्तदान केले. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पोळ, केंद्रीय समिती सदस्य डॉ. माळी, माजी महापौर शिवाजीराव कवाळे, जायंटस् ग्रुप ऑफ शिवसमर्थच्या फेडरेशन ऑफिसर स्नेहल जाधव, अध्यक्षा डॉ. आशा शितोळे, सचिव संयोगिता देसाई, उपाध्यक्ष उषा नाईक, सुरेश बडसे, शिवरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा शितल पंदारे, उपाध्यक्षा तेजस्विनी पार्टे, खजानिस रुपाली तोडकर, कार्यवाह प्रधाने उपस्थित होते. शिबिर वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या सौजन्याने झाले.
...
20946
कोल्हापूर : डॉ. राजकुमार पोळ यांना पुरस्कार देताना विजयकुमार चौधरी.
डॉ. पोळ यांना सर्वोत्कृष्ठ अध्यक्ष पुरस्कार
कोल्हापूर : जायंटस् वेलफेअर फाउंडेशनचे ४६ वे आंतरराष्ट्रीय तीन दिवसीय अधिवेशन दमण (गुजरात) येथे झाले. ‘दमण’चे प्रशासक प्रफुल्ल पटेल, वर्ल्ड चेअरमन शायना एन.सी., दमण संसद सदस्य लालुभाई यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. जायंटस् फेडरेशन २ ‘क’चे अध्यक्ष डॉ. राजकुमार पोळ यांना डेप्युटी वर्ल्ड चेअरमन विजयकुमार चौधरी, दिनेश द्स, लालुभाई यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ फेडरेशन अध्यक्ष पुरस्कार देण्यात आला. ‘जायंटस्’मधील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. पोळ यांचा सत्कार केला. केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा, डॉ. अनिल माळी, डॉ. सतिश बापट, मंगला कुलकर्णी, रामनारायण उंटवाल, अॅड. विलासराव पवार यांचे योगदान लाभले.
...
20951 डॉ. पी. एम. चौगुले
20954 डॉ. महावीर मिठारी
20955 डॉ. संजय घोटणे
डॉ. पी. एम. चौगुले अध्यक्षपदी
कोल्हापूर : जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी डॉ. पी. एम. चौगुले यांची निवड झाली. कार्यकारिणी अशी : सचिव डॉ. महावीर मिठारी, उपाध्यक्ष डॉ. संजय घोटणे, माजी अध्यक्ष डॉ. रमाकांत दगडे, खजानिस डॉ. अरुण धुमाळे, महिला प्रतिनिधी डॉ. मनिषा बागवडे, डॉ. जयमाला शिंदे, डॉ. रेखा जोशी, कार्यकारिणी सदस्य डॉ. संदीप साळोखे, डॉ. नवीन घोटणे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. पी. जी. पुजारी, सल्लागार समिती डॉ. उद्यम व्होरा, डॉ. आनंद कामत, डॉ. विश्वनाथ मगदूम, मानद सदस्य डॉ. गीता पिलाई, डॉ. ए. बी. पाटील.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56950 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..