पालकमंत्री सतेज पाटील- मान्सून पूर्व आढावा बैठक_ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री सतेज पाटील-  मान्सून पूर्व आढावा बैठक_
पालकमंत्री सतेज पाटील- मान्सून पूर्व आढावा बैठक_

पालकमंत्री सतेज पाटील- मान्सून पूर्व आढावा बैठक_

sakal_logo
By

20964
कोल्हापूर ः मान्सून पूर्व आढावा बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा
पालकमंत्री सतेज पाटील ; मान्सून पूर्व आढावा बैठकीत उपाययोजना करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१० : शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करून मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या. जिल्ह्याची मान्सून पूर्व आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व उपाययोजना करा. पण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्यात कोणतीही त्रुटी राहू नयेत. नागरिक व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, धान्य वाटप आदींचे काटेकोर नियोजन करा. नागरिकांची तक्रार येवू नये. पुनर्वसनासंबंधीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तालुक्यांना बोटी आणि अन्य आवश्यक ती साधन सामग्री उपलब्ध करून द्या, पूरप्रवण क्षेत्रात बोटी तैनात ठेवा. घाटमाथ्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक चर काढून घ्या. जिल्ह्यात दरडी कोसळून झालेले नुकसान व आवश्यक उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव तयार करा, हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल.
महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सूर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कुंभार यांच्यासह यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.
-------------
‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम'' वापराचे
नियोजन ; जिल्हाधिकारी रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेऊन तालुकानिहाय नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’चा प्रभावीपणे वापराचे नियोजन केले आहे.

‘स्टार्ट अप’च्या
तरुणांची मदत घ्या
पुराच्या पाण्यात ट्रान्सफॉर्मर बुडाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आणि शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यावर उपाय म्हणून पूरपरिस्थितीत ट्रान्सफॉर्मर प्लास्टिकच्या आवरणाने सुरक्षित पद्धतीने झाकून घेता येतील का? याचा विचार करा. याकामी ‘स्टार्ट अप’च्या तरुणांची मदत घ्या, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56956 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top