अठरा दिवसात साकारले चित्ररथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अठरा दिवसात साकारले चित्ररथ
अठरा दिवसात साकारले चित्ररथ

अठरा दिवसात साकारले चित्ररथ

sakal_logo
By

20925 (मोठा वापरणे),20922
.............
अठरा दिवसात साकारले चित्ररथ
समग्र शाहूकार्य नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न ; सेल्फी पॉईंटचा प्रभावी वापर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः लोकराजा राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी कृतज्ञता पर्वांतर्गत चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शाहू विचारांचा जागर सुरू झाला आहे. फायबर माध्यमातील कल्पक आणि देखणे चित्ररथ येथील युवा शिल्पकारांनी केवळ अठरा१८ दिवसात साकारले असून शाहू चरित्रातील महत्वपूर्ण प्रसंग, त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी त्यांनी केलेली प्रतिकात्मक मांडणीही कौतुकाचा विषय ठरत आहे.
शिल्पकार मंगेश कुंभार आणि १० जणांच्या टीमने केलेल्या चित्ररथातून रणरागिणी ताराराणींनी छत्रपती शिवरायांचा वारसा राजर्षी शाहूंकडे दिल्याची प्रतिकात्मक मांडणी केली आहे. त्याचबरोबर राजर्षी शाहूंची वंशवेल, राजर्षी शाहूंचे आधुनिक विचार, त्यांचे शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन, परदेश भेटीदरम्यान घडलेले विविध प्रसंग आदी शिल्पांचाही या चित्ररथामध्ये समावेश आहे. दहा फूट बाय पंधरा फूट आकाराचा हा चित्ररथ आहे.
शिल्पकार सत्यजीत निगवेकर, संतोष खुपेरकर आणि पंधरा जणांच्या टीमने राजर्षी शाहूंचा सर्वधर्मसमभावाचा विचार चित्ररथातून मांडताना राजर्षी शाहूंनी सर्वधर्मीयांसाठी उभारलेली धार्मिकस्थळे, त्यासाठी केलेली मदत, सर्व समाजातील लोकांना मंदिरात प्रवेशासाठीचा आदेश, जोतिबाची चैत्रयात्रा, श्री अंबाबाईचा रथोत्सव, शककर्ते शिवाजी महाराज व ताराराणींचा रथोत्सव, प्लेगच्या काळातील राजर्षी शाहूंचे कार्य व त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय आदी गोष्टींवर आधारित शिल्पांचा समावेश आहे. ९ फूट बाय १६ फूट आकाराचा हा चित्ररथ असून त्याची उंची १० फूट आहे.

माती, नाती आणि प्रगती...
फायबर माध्यमातील शिल्पांचा समावेश असलेल्या या दोन चित्ररथांशिवाय निर्मिती व उल्का आर्टसच्या माध्यमातून तीन चित्ररथ साकारले असून विविध कटआऊटस् आणि चित्रांसह थ्रीडी मॉडेल्सचा वापर केला आहे. प्रसिध्द जाहिरातकार अनंत खासबारदार यांच्या संकल्पनेतून हे चित्ररथ तयार झाले असून राजर्षी शाहूंचे जलसिंचन धोरण एका चित्ररथातून मांडले आहे. राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील विविध प्रसंगांचा वेध घेणारा दुसरा चित्ररथ असून राजर्षींच्या शैक्षणिक कार्यावर आधारित तिसरा चित्ररथ आहे. सारस्वत बोर्डिंगचे थ्रीडी मॉडेल हे या चित्ररथाचे वैशिष्ट्य आहे. तरूणाई आकर्षित व्हावी, यासाठी सर्व चित्ररथांचा सेल्फी पॉंईट म्हणूनही प्रभावी वापर केला आहे.

कोट
राजर्षी शाहूंनी २८ वर्षाच्या कारकिर्दीत माती, नाती आणि प्रगती या तीन्हीमध्ये अमुलाग्र बदल केला. मातीत पाणी आणले. नात्यांत सामाजिक एकोपा आणला तर प्रगती करताना पुढील शंभर ते दीडशे वर्षांचा विचार केला. हेच शाहूकार्य चित्ररथातून सर्वांसमोर आणले आहे.
- अनंत खासबारदार, प्रसिध्द जाहिरातकार

सर्वसामान्य माणसू केंद्रबिंदू मानून राज्यकारभाराचा छत्रपती शिवरायांचा वारसा रणरागिणी ताराराणींनी राजर्षी शाहूंकडे सोपवला, असा संदेश चित्ररथातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कमीत कमी कालावधीत चित्ररथासाठी शिल्प तयार करण्याचे आव्हान होते. पण ते पूर्ण केले.
- मंगेश कुंभार, शिल्पकार

राजर्षी शाहूंनी सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी काम केले. अनेक क्रांतीकारी निर्णय घेवून त्याची अंमलबजावणीही केली. राजर्षींचा हाच विचार नव्या पिढीसमोर यावा, यासाठीचा संदेश आम्ही चित्ररथातून दिला आहे. मंदिरातील घंटेचा वापर त्यासाठी प्रतिकात्मक पध्दतीने केला आहे.
- सत्यजीत निगवेकर, शिल्पकार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56961 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top