जिल्ह्यात पाच पोलिस अधिकाऱ्‍यांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पाच पोलिस  अधिकाऱ्‍यांच्या बदल्या
जिल्ह्यात पाच पोलिस अधिकाऱ्‍यांच्या बदल्या

जिल्ह्यात पाच पोलिस अधिकाऱ्‍यांच्या बदल्या

sakal_logo
By

जिल्ह्यात पाच पोलिस
अधिकाऱ्‍यांच्या बदल्या
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः पोलिस निरीक्षक दर्जाच्या जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्‍यांच्या बदल्या जिल्हांतर्गत करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
वैभववाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांची वेंगुर्ले ठाण्याकडे बदली झाली आहे. तेथील निरीक्षक तानाजीराव मोरे ३१ मे रोजी निवृत्त होत असून या रिक्त जागी विनंतीनुसार जाधव यांना नियुक्ती देण्यात आली आहे. ओरोस येथील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत मात्र दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदभार सांभाळणारे अशोक भोसले यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत विनंती बदली झाली. जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अमित यादव यांची वैभववाडी ठाण्यात बदली झाली. जिल्हा नियंत्रण कक्षातील निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची दोडामार्ग ठाण्यात बदली झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील निरीक्षक विजय यादव यांची मालवण ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाली. मालवणचे निरीक्षक सोनू ओटवणेकर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी यादव यांची बदली झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56969 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top