
ऑनलाईन वीज बिल भरणा..
ऑनलाईन वीजबिल भरण्यात हातकणंगले भारी
सुत गिरण्यांमुळे ४८ कोटी ६ लाख जमा; दुर्गम गावांमधूनही प्रतिसाद
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील वीज ग्राहक ऑनलाईन वीज बिल भरण्यात भारी ठरले आहेत. मार्च २०२२ चा विचार करता तालुक्यातील १ लाख २० हजार ६८४ ग्राहकांनी १९ कोटी ९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. हातकणंगले तालुक्यात सुत गिरण्यांचा आकडा अधिक असल्याने ऑनलाईन बिल भरण्यात तालुक्यातील रक्कमेचा आकडा तब्बल ४८ कोटी ६ लाख रुपये इतका राहिला आहे.
सात-आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीज बिल भरण्याचे प्रमाण कमी होते. कोरोना काळात ऑनलाईन बिले भरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला. यात ग्राहकाला वीज बिलाच्या ०.२५ टक्के किंवा ५०० रुपये पर्यंत सूट मिळते. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय आहे.
त्याचा फायदा ग्राहक फायदा उठवतत आहेत. ग्रामीण भागातही ऑनलाईन बिल भरण्याचा ट्रेंड वाढत आहे. विशेषतः दुर्गम गावातील ग्राहकही ऑनलाईन बिल भरण्याकडे वळत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महावितरणची गो ग्रीन संकल्पना अंमलात येत असल्याचे चित्र आहे.
........
चौकट
गत वर्षात...
- गत वर्षात लघुदाब ग्राहकांकडून एकूण १९ हजार ३४७ कोटी ५५ लाख ऑनलाईन भरणा
- उच्चदाब वीज ग्राहकांकडून वर्षभरात ३४ हजार ६०२ कोटी ८८ लाखाचा ऑनलाईन भरणा
- धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशीर होणे किंवा अन्य अडचणींचे अडथळे पूर्णतः दूर
.........
चौकट
ऑनलाईन वीज बिल भरणा लघुदाब ग्राहक (मार्च २०२२)
तालुका*ग्राहक * रक्कम
आजरा*१२ हजार १७६* १ कोटी ०५ लाख
करवीर*१ लाख २० हजार ६८४* १९ कोटी ९ लाख
हातकणंगले*७३ हजार ६२८*४८ कोटी ६ लाख
शिरोळ*२२ हजार ३९७* ५ कोटी ४० लाख
कागल*३५ हजार १३७*९ कोटी ३९ लाख
पन्हाळा* १९ हजार ५८९*२ कोटी ११ लाख
गडहिंग्लज*१३ हजार १५४*१ कोटी २४ लाख
राधानगरी*११ हजार ४२६*९४ लाख
चंदगड*२१ हजार ६९०*२ कोटी १९ लाख
शाहूवाडी*१२ हजार २५८*१ कोटी ६ लाख
भुदरगड*१० हजार ५०९ *१ कोटी ३ लाख
गगनबावडा*१ हजार ७०६*१८ लाख
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56975 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..