
फुटबॉल
20914
‘खंडोबा’ची विजयी घोडदौड कायम
---
‘फुलेवाडी’वर ५-१ असा विजय
कोल्हापूर, ता. १० : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्लबवर ५- १ असा एकतर्फी विजय मिळविला. सामन्या दरम्यान खेळाडूंमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्याची सुरुवात जोरदार झाली. सामान्यांच्या पाचव्या मिनिटाला ‘फुलेवाडी’च्या तेजस जाधव याने गोल नोंदवत आघाडी घेतली. यानंतर आक्रमक खेळ सुरू ठेवत गोलसाठी प्रयत्न केले; पण यश आले नाही. यानंतर खंडोबा संघाने खेळ बदलत जोरदार चढाया केल्या. यात श्रीधर परब याने २७ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला. पाठोपाठ सागर पोवार ३२, प्रभू पोवार ३५ व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात आघाडी ३- १ अशी केली. उत्तरार्धातही खंडोबा संघाने वर्चस्व राखले. यात प्रभू पोवार याने वैयक्तिक दुसऱ्या, तर संघासाठी चौथ्या गोलाची नोंद केली. कुणाल दळवी याने ६० मिनिटाला गोल नोंदवत यावर कळस चढविला. अखेर ‘खंडोबा’ने हा सामना ५- १ ने जिंकला. ‘फुलेवाडी’च्या तेजस जाधवला लढवय्या खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हात उचलण्यापर्यंत झाले. यात प्रभू पोवारला रेड कार्ड दाखविण्यात आले. त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. ‘फुलेवाडी’च्या अरबाज पेंढारीला चुकीचा खेळ केल्याबद्दल दोन यलो मिळून एक रेडकार्ड देण्यात आले. त्याच्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली.
आजचा सामना ः
दुपारी चार- ‘खंडोबा’ विरुद्ध ‘दिलबहार’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56984 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..