
पंडित शिवकुमार शर्मा आणि कोल्हापूर
अल्लादिया खाँ, रंकाळा
महोत्सवात रंगल्या होत्या मैफली
कोल्हापूर ः जगप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जादुई वादनाने कोल्हापूरकरांचीही मने जिंकली होती. येथे २००६ मध्ये झालेल्या रंकाळा महोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा राजर्षी शाहू संगीत महोत्सव आणि २०१२ मध्ये झालेल्या अल्लादियाँ खाँ संगीत महोत्सवात त्यांच्या संतूरवादनाची मैफल रंगली होती. या मैफली आजही कोल्हापूरकरांच्या मनावर कोरल्या आहेत. गायन समाज देवल क्लबलाही त्यांनी यावेळी भेट दिली होती. अलीकडच्या काळात दहा वर्षांपूर्वी त्यांची छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, व्हायोलीन ॲकॅडमी (पुणे) स्वरझंकार, गायन समाज देवल क्लबतर्फे झालेल्या संगीत सम्राट अल्लादिया खाँ संगीत महोत्सवात मैफल रंगली होती. यावेळी त्यांच्या हस्ते गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना ‘संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खाँ स्मृती जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56999 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..