विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीबाबत मंत्रालयात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीबाबत मंत्रालयात बैठक
विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीबाबत मंत्रालयात बैठक

विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीबाबत मंत्रालयात बैठक

sakal_logo
By

विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीबाबत
मंत्रालयात बैठक

कोल्‍हापूर, ता. १० : जिल्‍हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ३६२ विज्ञान शिक्षकांना पदोन्‍नती देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्गम भागात पदोन्‍नती मिळालेले शिक्षक जाण्यास तयार नसल्याने पदोन्‍नती थांबवण्याचा निर्णय जिल्‍हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी घेतला. त्याचबरोबर पोर्टलदवारे शिक्षक बदल्या होणार असल्याने इतर शिक्षकांवरही अन्याय होण्याची शक्यता असल्याने श्री.चव्‍हाण यांनी या पदोन्‍नतीस नकार दिला आहे. या विरोधात शिक्षक संघटनांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली होती. सतत होत असलेल्या तक्रारीनंतर मंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस मंत्री मुश्रीफ यांच्यासह शिक्षण विभागाचे सचिव व प्रशासक चव्‍हाण उपस्‍थित राहणार आहेत.
दरम्यान मंगळवारी मंत्रालयात आपले सरकार सेवा केंद्राबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सेवा केंद्रांच्या अडचणी, कर्मचारी पगार यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव या बैठकीस उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57006 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top