नदीकाठची अतिक्रमणे तात्काळ काढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीकाठची अतिक्रमणे तात्काळ काढली
नदीकाठची अतिक्रमणे तात्काळ काढली

नदीकाठची अतिक्रमणे तात्काळ काढली

sakal_logo
By

पूरपरिस्थितीला कारणीभूत अतिक्रमणे काढा

डॉ.निलम गोऱ्हे ; अंबाबाई, जोतिबा मंदिरात वॉटरप्रुफिंगची काम करा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांसह कोणीही हस्तक्षेप करणार नाहीत, त्यामुळे पूरपरिस्थितीला कारणीभूत असणारी नदीकाठची अतिक्रमणे तात्काळ काढली पाहिजे. अंबाबाई मंदिर किंवा जोतिबा मंदिरातून पावसाचे पाणी झिरपत त्या ठिकाणी वॉटरप्रुफिंगची कामेही जलदगतीने करावीत, अशा सूचना विधानप रिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.निलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सांगितले. गोऱ्हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा फटका बसतो. महानगरपलिका आयुक्तांनी २००५ ची पूररेषा आहे. त्याआधीच्या बांधकामांचा आढावा घेवून त्यावर तात्काळ कारवाई करावी. सर्वसामान्य लोकांचे पूनवर्सन करूनच त्यांच्यावर कारवाई करावी. गेल्यावर्षी ज्यांना पुराची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
त्यांना तात्काळ मदत द्यावी. पुरामुळे वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करावेत. विविध ठिकाणी कचरा दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या पातळीवर ज्या ठिकाणी कचरा आहे, तो पहिला पावसाच्या आधी उचलला पाहिजे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व मंजित माने उपस्थित होते.
....

नद्यांचा गाळ काढण्यासाठी
हरित लवादाकडे मागणी
पंचगंगा आणि कृष्णा नदी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी गाळ काढणे आवश्‍यक आहे. आपत्ती व्यवस्थान कायद्याखाली हा गाळ तात्काळ काढला पाहिजे, यासाठी हरित लवादाकडे गाळ काढण्याची मागणी करणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


‘राज यांना बुडताना
काठावर शिवसेना दिसेल''
कोल्हापूर : राज ठाकरे यांनी पक्ष वाढवण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही, झेंडा बदलला, भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन झाला, आता परत ते हिंदुत्वाकडे वळले आहेत. पण, राज ठाकरे ज्यावेळी बुडायला लागतील आणि किनाऱ्याकडे पाहतील, त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय काहीही दिसणार नाही, अशी टिका श्री. गोऱ्हे यांनी केली. त्या म्हणाल्या, राज ठाकरे आपला पक्ष वाढवण्यासाठी हातपाय मारत आहेत. पण कशातच त्यांना यश येत नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. भाजपला पाठिंबा दिला. यातूनही काही साध्य होत नाही म्हटल्यावर पुन्हा हिंदुत्वाकडे वळले आहेत. वास्तविक काही लोक त्यांना पाण्यात ढकलून त्यांचा गेम करण्यासाठी हे राजकारण करत आहेत. खासदार नवनीत राणांबद्दल बोलातना त्या म्हणाल्या, अधिकृत पेशंटच्या तपासणी होत असताना कधीही फोटो काढले जात नाहीत. मग, खासदार नवनीत राणा यांचे हॉस्पिटलमधील तपासणीचे फोटा काढले कसे. त्यांनी आपल्या डोक्‍याचा फोटो काढून घ्यावा.

अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी
कोल्हापूर ः विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेवून मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. मंदिरात सध्या सुरु असणाऱ्या संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी माहिती घेऊन त्यानुषंगाने असणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्यांविषयीही त्यांनी जाणून घेतले. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडून मंदिरातील अभिषेक पद्धती व पूजा विधी याबाबत माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57009 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top