
चिकोत्रा धरणे आंदोलन
चिकोत्रा धरणग्रस्त
कुटुंबीयांचे धरणे
कोल्हापूर ः चिकोत्रा धरणग्रस्तांस २७ वर्षे जमीन मिळाली नाही, म्हणून धरणग्रस्त चव्हाण कुटुंबीयांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. विजया गणपती चव्हाण व गणपती गुंडू चव्हाण (मु.बेगवडे, ता.भुदरगड) हे धरणे आंदोलन करीत असून, वेळीच दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिली. चिकोत्रा मध्यम प्रकल्पग्रस्त असून, दहा एकर जमीन प्रकल्पात संपादन केली आहे. जमीन संपादन केलेल्या तारखेपासून निर्वाह मिळाला नाही. तो तातडीने मिळावा, निवासी घरासाठी जागा मिळाली नाही ती मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी चव्हाण कुटुंबीयांनी आजपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी याबाबतच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना पाठविली आहे. तातडीने महसूल विभागाने दखल न घेतल्यास जलसमाधीचेही पाऊल ते उचलणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57020 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..