पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टा
पट्टा

पट्टा

sakal_logo
By

रेल्वेतून २७ लाखांची रोकड
चोरणाऱ्या सहाजणांना अटक
रत्नागिरी : सोने तपासणीचे हॉलमार्क मशिन खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्यांची २७ लाख ८६ हजार रक्कम असलेली बॅग लांबविणाऱ्या सहा चोरट्यांच्या शहर पोलिसांनी केरळ येथे मुसक्या आवळल्या. शहर पोलिसांनी ३६ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणत रक्कम हस्तगत केली आहे. सूरज बाळासाहेब हसबे (वय २२), उमेश वसंत सूर्यगंधा (रा. वाळवा, जि. सांगली), अजय नेताजी शिंदे (२२, रा. खानापूर, सांगली), तुषार किसन शिंदे, यश राजेंद्र वेदपाठक, विकास सुरेश चंदनशिवे (सर्व रा. खानापूर, सांगली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. १ मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दोन व्यापारी जामनगर तिरूवल्ली एक्स्प्रेसने केरळला निघाले होते. त्यामध्ये प्रशांत भीमराव माने व रावसाहेब माहीम (दोन्ही रा. सातारा) असे या व्यापाऱ्यांचे नाव आहे. या व्यापाऱ्यांकडील २७ लाख ८६ हजार रुपये रोकड असणारी बॅग रेल्वे प्रवासात अवघ्या १० मिनिटांत चोरीला गेली होती. रेल्वे कणकवलीजवळ आली असता बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी पथक तयार करत पुरावे गोळा करून थेट केरळ गाठत कारवाई केली
०००००००
मोटारीतून ७५ लाख जप्त
सांगली : बस स्थानक रस्त्यावरील हॉटेल सिटी पॅलेससमोर सांगली शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एका मोटारीतून तब्बल ७५ लाखांची रोकड जप्त केली. मोटारीतील आकाश नारायण केंगार (वय २७, आंबानगर, आटपाडी), सुनील शहाजी कदम (वय ३५), महेंद्र लक्ष्मण जावीर (वय २६, दोघे रा. कौठुळी, ता. आटपाडी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तिघे जण एका सराफाकडे कामास असून, रकमेबाबत काही माहिती देता आली नाही, परंतु एका सराफाने रकमेबाबत मालकी सांगितली आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी करून आयकर विभागाला माहिती कळवली जाणार आहे.
००००००००००
शिवसेनेच्या दोन गटांत तू-तू; मैं-मैं
चिपळूण ः येथे शिवसंपर्क अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीनंतर माजी मंत्री रामदास कदम समर्थक आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने गंभीर प्रसंग टळला. पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात पदाधिकारी आक्रमक झाल्यावर परब यांचे समर्थकही तितक्याच ताकदीने आता मैदानात उतरले आहेत. पक्षांतर्गत विरोधकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, याची व्यूहरचना परब समर्थकांकडून आखली जात आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे.
०००००००००००
आर्थिक व्यवहारातून खून?
रत्नागिरी : आंबा घाटातील खून प्रकरणाचा हळुहळू उलगडा होऊ लागला आहे. यातील सुत्रधार रावण गॅंगचा म्होरक्या असून पैशाच्या व्यवहारातून मित्रांनीच हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह महादेव उर्फ दादासाहेब निगडे (वय ३०) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी हातकणंगले येथील सूरज मेहबूब चिकोडे (वय २५) गणेश राजेंद्र शिवारे (३०) प्रतीक बापूसाहेब कोळी (सर्व रा. तारदाळ) या तिघांना ताब्यात घेतले होते. या तिघांना आज ता. १६ पर्यंत कोठडी मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57036 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top