
‘ओंकार’चा रौप्य महोत्सव उत्साहात
21056
गडहिंग्लज : ओंकार शिक्षण संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त हसन मुश्रीफ यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना राजन पेडणेकर.
‘ओंकार’चा रौप्य महोत्सव उत्साहात
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हितचिंतकांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या वेळी संस्थापक अध्यक्ष राजन पेडणेकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. १९९७ मध्ये सुरू झालेल्या संस्थेतर्फे १९९८ ला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर २००४ मध्ये राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. संस्थेची वाटचाल गौरवास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार दिनेश पारगे, डॉ. सतीश घाळी, अॅड. बी. बी. घाटगे, शशिकला पाटील, दीपक कुराडे, अमर मांगले, डॉ. राजश्री पट्टणशेट्टी, आप्पा शिवणे, अर्जून दुंडगेकर, सुरेश थरकार, रुपाली कांबळे, गणपतराव पाटोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष राजन पेडणेकर, उपाध्यक्ष डॉ. ऋतुजा बांदिवडेकर, संचालक रवींद्र कारेकर, प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57101 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..