
श्री बाळूमामा मंदिरास पद्मनाभन स्वामींची भेट
21057
गडहिंग्लज : श्री बाळूमामा मंदिरास प. पू. पद्मनाभन स्वामींनी भेट दिली. याप्रसंगी रमेश रिंगणे, शिवाजी पाटील, के. टी. शेलार, संपदा पडदाळे आदी.
श्री बाळूमामा मंदिरास
पद्मनाभन स्वामींची भेट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : येथील श्री संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिरास बंगळूरचे प. पू. पद्मनाभन स्वामी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्रघोषात बाळूमामा व हालसिद्धनाथाच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले.
यावेळी संपदा पडदाळे व अनिता पडदाळे यांनी पादपूजन केले. मंदिर सेवा संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी स्वामींचे स्वागत केले. सामानगडचे सेवेकरी के. टी. शेलार उपस्थित होते. श्री. स्वामीजी म्हणाले, ‘प्रपंच हाच परमार्थ मानून सुरू असलेल्या कार्याला प्रामाणिक रहावे. मंदिर परिसर, अन्नछत्र व मंदिराबाबत सुरू असलेल्या धार्मिक कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.’ शेलार यांचा सत्कार बाळूमामा काडापुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अरुण बेल्लद, विठ्ठल भमानगोळ, राजशेखर यरटे, जयसिंग पोवार, प्रकाश धबाले, सुधीर पाटील, प्रकाश भमानगोळ, जवाहर घुगरे, राजू पोवळ, आप्पासाहेब बस्ताडे, शिवाजी पाटील-जरळीकर, दुंडाप्पा पाटील, बसवाणी मगदूम, रावसाहेब कुरबेट्टी, बबन गंधवाले, क्रांतिजित रिंगणे, दयानंद रिंगणे, रवी ठबाणे उपस्थित होते. गिजवणे सोसायटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब पाटील यांचा सत्कार झाला. दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल भमानगोळ यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57103 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..