पेयजल योजनेची सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेयजल योजनेची सुरवात
पेयजल योजनेची सुरवात

पेयजल योजनेची सुरवात

sakal_logo
By

21074
देवरवाडी ः पेयजल योजनेच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ.

देवरवाडीत पेयजल योजनेच्या कामास प्रारंभ
९६ लाखांची योजना, विहिरीसह पाईपलाईनचा योजनेत समावेश
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ ः देवरवाडी (ता. चंदगड) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. सरपंच गीतांजली सुतार, योजनेसाठी आपल्या मालकीची जमीन देणारा शेतकरी लक्ष्मण कांबळे, विष्णू कांबळे यांच्या हस्ते या कामाची सुरवात झाली. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना ग्रामपंचायतीने केंद्र शासनाच्या पेयजल योनजेसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार या योजनेसाठी ९६ लाख रुपये मंजूर झाले. त्यामध्ये विहिरी आणि पाईपलाईनचा समावेश आहे. तालुक्याच्या एका टोकाला कर्नाटक सीमेवर वसलेल्या या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्‍नासाठी हा निधी मंजूर झाल्याबद्दल सरपंच गोविंद आडाव यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी सदस्या मनीषा भोगण, मंजुरा कांबळे, प्रभावती मजुकर, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विक्रांत भोगण, दीपक केसरकर, मष्णू वर्पे, विजय सुतार, गणपत भोगण, नरसिंग कांबळे, विनोद मजुकर, पोलिसपाटील जयवंत कांबळे, संजय नाकाडी, संघर्ष प्रज्ञावंत उपस्थित होते. प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57125 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top