स्त्रीयांनी आर्थिक स्वावलंबनाकरीता कौशल्य आत्मसात करावी : लोहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्रीयांनी आर्थिक स्वावलंबनाकरीता कौशल्य आत्मसात करावी : लोहार
स्त्रीयांनी आर्थिक स्वावलंबनाकरीता कौशल्य आत्मसात करावी : लोहार

स्त्रीयांनी आर्थिक स्वावलंबनाकरीता कौशल्य आत्मसात करावी : लोहार

sakal_logo
By

21075
चंदगड ः विद्यार्थिनींना हस्तकौशल्याची माहिती देताना संजना लोहार.

स्त्रियांनी आर्थिक स्वावलंबनाकरिता
कौशल्य आत्मसात करावी : लोहार
माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्त्रियांनी विविध कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे मत येथील संजना प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका संजना लोहार यांनी व्यक्त केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात जागर जाणिवांचा अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. शिवणकला, रांगोळी, महेंदी, सौंदर्यप्रसाधने याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर अध्यक्षस्थानी होते.
लोहार म्हणाल्या, ‘‘आधुनिक युगात स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विविध क्षेत्रांत त्या महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, मात्र यशोशिखर गाठताना काही महिलांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागते. अशा वेळी आर्थिक गरजा भागवताना आपल्याकडील कौशल्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. एखादे कौशल्य विकसित केले की आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्याचा लाभ होतो.’’ समन्वयक प्रा. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टी आत्मसात करून त्यावर आधारित व्यवयास सुरू केल्यास आर्थिक गरजा भागवता येतात, असे मत मांडले. या कार्यशाळेतून अशा व्यवसायांचे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. डॉ. भादवणकर म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात सौंदर्य प्रसाधने, बेकरी पदार्थ, केक बनवणे, मेहंदी रेखाटने यातून घरबसल्या व्यवसाय निर्माण झाले आहेत. त्याचे तांत्रिक कौशल्य आत्मसात केले की व्यवसायाला सुरवात करता येते.’’ निकिता गावडे यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्विनी तुप्पट यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57126 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top