कलावती सोनार बसर्गेच्या उपसरपंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलावती सोनार बसर्गेच्या उपसरपंच
कलावती सोनार बसर्गेच्या उपसरपंच

कलावती सोनार बसर्गेच्या उपसरपंच

sakal_logo
By

21077
कलावती सोनार

कलावती सोनार बसर्गेच्या उपसरपंच
चंदगड ः बसर्गे (ता. चंदगड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कलावती सोनार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सागर गुरव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी सोनार यांना संधी देण्यात आली. ग्रामपंचायतीवर माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील गटाची सत्ता असून सोनार सलग दोन वेळा ग्रामपंचायत सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना या पदावर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच तुकाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. या वेळी सर्व सदस्यांसह ‘गोकुळ’चे माजी संचालक दीपक पाटील, मारुती कुट्रे, राम पाटील, वसंत चव्हाण, सुभाष पाटील, सागर गुरव, तुकाराम बेनके उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57128 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top