ओलम साखर कारखान्यातर्फे ऊस नोंद, कराराचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओलम साखर कारखान्यातर्फे ऊस नोंद, कराराचे आवाहन
ओलम साखर कारखान्यातर्फे ऊस नोंद, कराराचे आवाहन

ओलम साखर कारखान्यातर्फे ऊस नोंद, कराराचे आवाहन

sakal_logo
By

ओलम साखर कारखान्यातर्फे
ऊस नोंद, कराराचे आवाहन
कोवाड, ता. ११ ः राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्यात उसाची नोंदणी व तोडणी, वाहतुकीच्या कराराचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कारखान्याच्या शेती कार्यालयात ऊस नोंद व कराराचे काम करून घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण १० शेती कार्यालयातून ऊस नोंद व तोडणी, वाहतुकीच्या कराराचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी १० हजार ८०० उसाच्या क्षेत्राची नोंद झाली होती. आतापर्यंत कारखान्याकडे ७६३३ हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. उसाची उचल करताना नोंद झालेल्या उसाला प्राधान्य दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या उसाची नोंद करून घ्यावी. ऊस उचल करण्यात भविष्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी शेती विभागातर्फे ऊस नोंदीचे काम वेगाने सुरू आहे. तोडणी, वाहतुकीच्या कराराचे काम सुरू आहे. ५२५ वाहतूक व तोडणीदारांनी कारखान्याकडे सहभाग नोंदविला आहे. टप्प्याटप्प्याने करार केले जात आहेत. गेल्या हंगामात ५२० तोडणी, वाहतुकीची यंत्रणा होती. त्यामुळे सात लाख वीस हजार टन उसाचे गाळप झाले. उसाची व तोडणी, वाहतुकीची संपूर्ण बिले आदा केली आहेत. चालू वर्षी ५३० टोळ्यांचे नियोजन आहे. बाहेरील यंत्रणा कमी करून स्थानिकाना प्राधान्य दिले जाणार असल्याने करार लवकर करून घ्यावा, असे कुंडल यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57130 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top