
आजऱ्यात उद्या रोजगार मेळावा
आजऱ्यात उद्या रोजगार मेळावा
आजरा : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरिता उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार आहे. येथील आजरा पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवार (ता. १३) सकाळी ११ वाजता मेळावा होईल. यावेळी मुख्यमंत्री रोजागारनिर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपीच्या) नियम अटी, त्याचबरोबर विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, विविध महामंडळ व्याज परतावा योजनेची वैशिष्ट्ये नियम व अटी, महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनांचे लाभ घेण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर जनसंपर्क कार्यालय गारगोटी (ता. भुदरगड) येथे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवीण पाटोळे, जितेंद्र भोसले, दत्तात्रय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57148 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..