‘आयजीएम’मधील ‘ते’ ४२ कर्मचारी वेतनापासून वंचीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयजीएम’मधील ‘ते’ ४२ कर्मचारी वेतनापासून वंचीत
‘आयजीएम’मधील ‘ते’ ४२ कर्मचारी वेतनापासून वंचीत

‘आयजीएम’मधील ‘ते’ ४२ कर्मचारी वेतनापासून वंचीत

sakal_logo
By

‘आयजीएम’मधील ‘ते’ ४२ कर्मचारी वेतनापासून वंचित
सेवा कालावधी निश्‍चितीचा पेच ः २०१९ पासून वेतन व भत्ते प्रलंबित

संदीप जगताप ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.११ : आयजीएम रुग्णालयात रुजू झालेले ‘ते’ ४२ कर्मचारी अद्याप वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ते डेपो डायरेक्टर आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार १० जानेवारीपासून हजर झाले आहेत. त्यांना चार महिने सेवा बजावूनही अद्याप वेतन मिळालेले नाही. याबाबत कर्मचाऱ्‍यांनी रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता सेवा कालावधी निश्चितीचे काम सुरू असून, त्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आणखी किती दिवस वेतनाची प्रतीक्षा करावी लागणार, हे मात्र अनिश्चित बनले आहे.
आयजीएम रुग्णालयाच्या ४२ कर्मचाऱ्‍यांना १ मे २०१९ पासून सार्वजनिक आरोग्य विभागाकडे समावेशनास मान्यता दिली. त्यानुसार १० जानेवारी रोजी १८ अधिपरिचारिका, १ क्ष-किरण तंत्रज्ञ आयजीएममध्ये रुजू झाले. उर्वरित कर्मचारी हे आरोग्य सेवा मंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध रुग्णालयात पाठवले, मात्र ते कर्मचारी सेवा बजावत असताना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे काही कर्मचारी उपोषाणाच्या तयारीत आहेत. समावेशन शासन निर्णय २७ डिसेंबर २०२१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन व भत्ते दिनांक १ मे २०१९ पासून आदा करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्‍यांमधून होत आहे.
आयजीएम रुग्णालय जून २०१६ रोजी शासनाकडे हस्तांतरित केले, मात्र काही कर्मचाऱ्यांच्या हस्तांतरणाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी प्रथम ६९ कर्मचाऱ्‍यांना शासनाकडे वर्ग करून घेतले होते. उर्वरित ५४ कर्मचाऱ्‍यांना पालिकेकडे रुजू करून घेतले होते. यातील काही कर्मचारी विकल्पानुसार पालिकेकडे वर्ग झाले, तर ४२ कर्मचाऱ्‍यांना शासनाने अस्थायी ठरवत त्यांचे समावेश करण्यास नकार दिला होता, पण कर्मचाऱ्‍यांच्या व तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने नगरविकास विभागाने कर्मचाऱ्‍यांना नियमित करून समावेश करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१९ ला घेतला होता. त्यानुसार पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्‍यांनी एप्रिल २०१९ रोजी ४२ कर्मचाऱ्‍यांना कार्यमुक्त केले होते. याच दिवशी या कर्मचाऱ्‍यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर येथे रुजू रिपोर्ट दिला होता. त्यानंतर पत्र व्यवहार व अन्य कारणांमुळे यांच्या नियुक्त्या रेंगाळल्या होत्या, मात्र २३ डिसेंबर २०२१ रोजी कर्मचाऱ्‍यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडे सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्याप्रमाणे १० जानेवारीला आयजीएममध्ये हे कर्मचारी रुजू झाले आहेत; पण त्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही.
----
वारसाला मिळणार नोकरी?
आयजीएममध्ये सेवा बजावत आलेले ४२ कर्मचाऱ्यांमधील एक कर्मचारी मृत आहे. त्याच्या वारसाची कागदपत्रे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिली आहेत. त्यामुळे सेवा बाजवणारा कर्मचारी मृत्यू पावला असला तरी त्याच्या वारसास नोकरी मिळण्याची आशा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57165 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top