आद्यशंकराचार्य जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आद्यशंकराचार्य जयंती
आद्यशंकराचार्य जयंती

आद्यशंकराचार्य जयंती

sakal_logo
By

21093

आद्य शंकराचार्य
जयंती उत्सवाला प्रारंभ

सहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाला आजपासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. श्री विद्यानृसिंह भारती यांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना अभिषेक झाला. वेदशास्त्र संपन्न सौरभ कुलकर्णी यांचे दशोपनिषद वाचन, सकाळी आठ वाजता वेदशास्त्र संपन्न रामचंद्र महाराज गंगाखेडकर यांचे गीताभाष्य आणि प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे ब्रह्मसूत्रभाष्य पारायण झाले.
संजय व्यास बुवा यांचे जन्मकाळ कीर्तन सकाळी अकरा वाजता झाले. त्यानंतर महिलांच्या मोठ्या उपस्थितीत पाळणा पूजन झाले. सायंकाळी पाच वाजता प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे प्रवचन झाले.
यावेळी पीठाचे अध्यक्ष रामकृष्ण देशपांडे, सचिव शिवस्वरूप भेंडे, सदस्य सुरेश कुलकर्णी, बत्ते महाराज आदी उपस्थित होते. दरम्यान, पुढील आठवडाभर पीठामध्ये होमहवन, कीर्तन, प्रवचन, शास्त्र सभा, पुरस्कार वितरण, षटचक्र माहिती, पुस्तक प्रकाशन व पालखी प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भेंडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57172 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top