दुंडगेची बजरंग सोसायटी सत्तारुढांकडेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुंडगेची बजरंग सोसायटी सत्तारुढांकडेच
दुंडगेची बजरंग सोसायटी सत्तारुढांकडेच

दुंडगेची बजरंग सोसायटी सत्तारुढांकडेच

sakal_logo
By

दुंडगेची बजरंग सोसायटी सत्तारूढांकडेच
आठ जागांवर विजय; विरोधकांना पाच जागा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील बजरंग सहकारी विकास सेवा सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. यामध्ये सत्तारूढांनी आठ जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित राखली. विरोधी पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. गतवेळेपेक्षा एक जागा सत्तारूढांनी गमावली, तर विरोधकांची एक जागा वाढली.
निवडणूक रिंगणात सत्तारुढांच्या जय बजरंग शेतकरी विकास पॅनेलविरुद्ध विरोधी जय बजरंग शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने आव्हान उभे केले होते. पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा सत्तारूढांनी सभासदांसमोर ठेवला होता. विरोधकांनी संस्थेच्या कारभाराविरोधात सभासदांचे परिवर्तन करण्यासह आगामी पाच वर्षांतील कार्यक्रम सभासंदासमोर ठेवला होता, मात्र विरोधकांना अपयश आले. संस्थेच्या ८२५ पैकी ७५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय तोडकर यांनी काम पाहिले.
सत्तारूढ पॅनेलचे विजयी उमेदवार व मते : किरण पाटील (३५८), प्रदीप देसाई (३६०), संजय करजगे (३६९), केतन पाटील (३४९), सुवर्णा संकपाळ (३५३), सुरेश गुलगुंजी (४०२), मारुती नाईक (३६९), आणाप्पा दावणे (३७०). विरोधी पॅनेलचे विजयी उमेदवार : सिदगोंडा पाटील (३८४), काशिनाथ संकेश्‍वरी (३८८), दिनेश मदकरी (३६४), संजय देसाई (३६९), श्रीमती सुरेखा घबाडे (४०२).
अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, उदयकुमार देसाई, अ‍ॅड. संजय देसाई, अशोक पाटील, रमेश संकपाळ, प्रकाश हरगापुरे, बाळाप्पा गुंडकल्ली, बाळासाहेब गुलगुंजी, किरण धनवडे यांनी सत्तारूढ प्रचाराची, तर बाबूराव मदकरी, सिदगोंडा पाटील, काशिनाथ संकेश्‍वरी, प्रकाश मगदूम, हणमंतराव कानडे यांनी विरोधी पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57180 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top